आजचे पंचांग व राशिभविष्य दि.०३/०९/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १२ शके १९४४
दिनांक = ०३/०९/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)
मेष
जुन्या कामांमधून यश मिळेल. घरात धार्मिक कार्य घडेल. जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. दिवसाच्या पूर्वार्धात रखडलेली कामे मार्गी लागतील. मुलांकडून शुभ वार्ता मिळतील.
वृषभ
सामाजिक मुद्यात लक्ष घालू नका. अपेक्षित उत्तर मिळेल. नवीन ओळखीतून लाभ होईल. अप्रिय व्यक्तीची भेट घडू शकते. शासनाकडून लाभाची शक्यता.
मिथुन
घरासाठी नवीन खरेदी केली जाईल. जुन्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. मन काहीसे विचलीत राहील. मुलांची प्रगती पाहून मन खुश होईल.
कर्क
मानसिक चंचलता राहील. अति विचार करू नका. महत्त्वाची कामे आज टाळावीत. कौटुंबिक जबाबदारी सांभाळावी लागेल. जवळचे मित्र भेटतील.
सिंह
प्रतिस्पर्ध्यावर विजय मिळवाल. अति कामामुळे थकवा जाणवेल. बोलण्यातील माधुर्यामुळे मान मिळवाल. व्यापारीवर्ग खुश राहील. कामाची धावपळ वाढेल.
कन्या
रखडलेली कामे पूर्ण करा. तुमच्या पराक्रमात वाढ होईल. मन प्रसन्न राहील. चांगल्या गोष्टीसाठी पैसे खर्च होतील. व्यापारी क्षेत्रातील प्रयत्न फळाला येतील.
तूळ
योग्य शहानिशा करावी. कौटुंबिक वातावरण समाधानकारक राहील. आनंदाची अनुभूति घ्याल. धनलाभाचे उत्तम योग आहेत. प्रेमातील व्यक्तींना उत्तम दिवस.
वृश्चिक
नवीन खरेदी कराल. विद्यार्थ्यांनी अति घाई करू नये. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. गुंतवणुकी संदर्भात नवीन गोष्टी जाणून घ्याल. अति विचारात वेळ वाया घालवू नका.
धनू
मानसिक शांतता लाभेल. कामात तुमचा उत्तम प्रभाव पडेल. सासरच्या मंडळीकडून धनलाभाचे योग आहेत. सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुने काम मार्गी लावण्याची संधी मिळेल.
मकर
धार्मिक कामाची आवड वाढेल. जोडीदाराच्या कलाने काम करा. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. मिळकतीच्या बाबतीतील प्रयत्न यशस्वी होताना दिसतील. भावनात्मकता टाळावी.
कुंभ
जोडीदाराचे म्हणणे टाळू नका. खेळ व कलेमध्ये रमाल. अति भावुक होऊ नका. पराक्रमाला चांगला वाव आहे. नियोजना अभावी कामे रेंगाळू शकतात.
मीन
आरोग्यात सुधारणा होईल. कामात अधिक स्फूर्ति येईल. मुलांसोबत दिवस खेळीमेळीत जाईल. उधारीचे व्यवहार करू नका. बोलण्याच्या भरात शब्द देऊ नका.
🙏 सुप्रभात 🙏
🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁
राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद १२ शके १९४४
दिनांक :- ०३/०९/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१६,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:४१,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- शुक्लपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति १२:२९,
नक्षत्र :- अनुराधा समाप्ति २२:५७,
योग :- वैधृति समाप्ति १७:००,
करण :- विष्टि समाप्ति २३:३८,
चंद्र राशि :- वृश्चिक,
रविराशि – नक्षत्र :- सिंह – पुर्वा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,
✿राहूकाळ:- सकाळी ०९:२२ ते १०:५५ पर्यंत,
♦ लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:४९ ते ०९:२२ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०२:०२ ते ०३:३५ पर्यंत,
अमृत मुहूर्त — दुपारी ०३:३५ ते ०५:०८ पर्यंत,
❀ दिन विशेष:-
गौरी आवाहन दिवसभर, अमुक्ता भरणव्रत, भद्रा १२:२९ नं. २३:३८ प., अष्टमी श्राद्ध,
————–
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर