सोनई-राहुरी रस्त्याचे बेसुमार निकृष्ट दर्जाचे, अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !

सोनई–दि ४ सोनई – राहुरी रस्त्याच्या काम अंतिम टप्प्यात आले असून रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईड गटारी केल्या आहेत, त्याला ना लेव्हल ,ना दर्जा असे काम रात्रीच्या वेळी घाईघाईने सुरू आहे, चेंबरवर टाकलेले सिमेंटचे झाकणं व बांधकाम केले आहे त्यावर पाणी मारण्यासाठी संबंधित असलेल्या ठेकेदारावर पाण्याचा सुकाळ आहे की काय? असा सवाल गोरक्षनाथ उर्फ भाऊसाहेब कोल्हे यांनी उपस्थित केला आहे.
११६ कोटीच्या सोनई – राहुरी रस्त्याच्या काम अंतिम टप्प्यात असले तरी रस्ता ठिकठिकाणी खराब झाला आहे, दूतर्फी असलेल्या नाल्या ह्या निकृष्ट दर्जाचे असून शासकीय अधिकारी यांनी तपासणी करून सर्वसामान्य नागरिकांना न्याय दयावा,या संदर्भात काही विचारणा केल्यास उडवाउडवीची उत्तरे दिली जातात,ज्या ज्या ठिकाणी चेंबरवरच काम केले तेथे कच्चा विटांची व कमी अधिक सिमेंट वापरून थातूर माथूर,असे काम रात्री उशिरापर्यंत चालू असते, ,देवीचा शेंदूर, देवीलाच लावण्याचा प्रयत्न सुरू आहे,ज्या नळ्या टाकल्या त्या एकसारख्या नसून कुठल्या तरी प्रकारची माती आणून नळ्या बुजवण्यात आल्या आहेत, जेथे सिमेंटचे काम झाले तेथे पाणी न वापरल्याने कामाचा दर्जा मिळणार नाही, असे मत व्यक्त करून या कामाची ठेकेदार,पाहणी करणाऱ्या अधिकारी यांची चौकशी करण्याची मागणी श्री.कोल्हे यांनी निवेदन द्वारे केली आहे.