इतर

आ. लंके यांच्या हस्ते मांडओहळ धरणाचा  जलपुजन  समारंभ संपन्न 


 पारनेर प्रतिनिधी :        

    पारनेर तालुक्याला वरदान ठरलेले मांडओहळ धरण पूर्ण क्षमतेने भरले असून त्यामुळे शेतकरी बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.पारनेर तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून सर्वश्रुत असताना,गेल्या काही दिवसापासून पर्जन्य राजाची कृपादृष्टी सुखकर झाल्यामुळे पारनेर तालुक्यातील अनेक गावातील पाझर तलाव व धरणे भरली असून काही भरण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.     

    तालुक्याची जीवनदायिनी म्हणून समजले जाणारे, 399 दशलक्ष घनफूट इतकी क्षमता असणारे व 2266 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार इतकी क्षमता असणारे मांडओहळ धरण ज्या धरणावर आज किमान अकराशे ते बाराशे हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येत आहे.1983 साली तयार झालेले धरण या धरणाचा विस्तार किमान एक ते दीड किलोमीटर इतका असून या धरणामुळे अनेक शेतकरी बांधवांच्या माळरान पडीक जमिनीला बागायती जमिनीचे रुप आले आहे. अशी माहिती उपविभागीय अभियंता व्ही . टी .  शिंदे शाखा अभियंता A .D.मोरे तसेच सिंचन शाखा शाखा टाकळी ढोकेश्वर कर्मचारी व अधिकारी यांचे कडून देण्यात आली .  

         नोव्हेंबर 2019-202O-2O21  या मागील तिनही वर्षी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. व त्याचे जलपूजन ही  पारनेर नगर विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी केले होते. व सोमवारीही या जलपूजन समारंभासाठी आमदार निलेश लंके यांनी उपस्थिती दर्शविली व जलपूजन केले .     

   विधानसभा निवडणूक प्रचार सभेत निलेश लंके हे वारंवार सांगत होते की पारनेर तालुक्यातील अनेक हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार व निवडणुकीचा निकाल लागला त्या दिवशी हे धरण पूर्ण क्षमतेने भरले व त्या वेळीही आमदार निलेश लंके यांनीच जलपूजन केले होते. व ऑगस्ट 2020 मध्येही ही हे धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. तसेच 06 ऑक्टोबर 2021 रोजीही हे धरण पुर्ण क्षमतेने भरले होते व या ही वेळेस शनिवार दि. 03 सप्टेबर 2022 रोजीही शेतकरी बांधवांना जीवनदायींनी ठरलेले हे धरण पूर्णपणे भरले असून. त्याचे जलपूजनही आमदार लंके यांच्या शुभहस्ते पार पडले.

 सदर जलपुजन कार्यक्रमास शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत हा जलपूजन समारंभ संपन्न झाला.        त्यावेळी आमदार निलेश लंके यांच्या समवेत प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापु शिर्के, प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब खिलारी , राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुनशेठ भालेकरबाजार समितीचे संचालक अशोक कटारिया राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अर्जुन भालेकर गुरुदत्त संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बा.ठ झावरे उपविभागीय अभियंता व्ही.टी .शिंदे शाखा अभियंता अभिजित मोरे पोटघन मेजर सतिष भालेकर रावसाहेब झावरे सुभाष ढोकळे नगरसेवक सुभाष शिंदे , श्रीकांत चौरे , सरपंच प्रकाश गाजरे , उपाध्यक्ष रवींद्र गायकेसंदिप चौधरी पोपटराव गुंड रवींद्र राजदेव सुनील गाडगे संभाजी वाळुंज शंकर कासोटे  उपसरपंच रामभाऊ तराळ महेश पाटील बाळासाहेब घुले अजित भाईक पार्वती चिकणे सरपंच पियुष गाजरे सरपंच प्रकाश गाजरे सत्यम निमसे प्रसाद नवले चंदू ठुबे अमोल उगले जेष्ठ नेते भागू दादा झावरे अमोल आल्हाट शंकर  दत्तात्रय निवडुंगे रामभाऊ थोरात  संपत झावरे शशीभाई आंधळे‌ युवराज मुळे‌ व सिंचन शाखा टाकळी ढोकेश्वर कर्मचारी उपस्थित होते.यांच्यासह मांडओहळ सत्र परिसरातील अनेक गावांमधील पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button