टाकळी ढोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनला राज्य शासनाची मंजुरी -सुजित झावरे पाटील.

दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या अडथळाची शर्यत पार करत अखेर टाकळी ढोकेश्वर, (ता. पारनेर). याठिकाणी स्वतंत्र पोलिस स्टेशनला राज्य शासनाने मंजुरी दिली
तसे आदेश महाराष्ट्र शासनाच्या गृहविभागाने काढले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सदर टाकळी ढोकेश्वर पोलिस स्टेशनला मंजुरी दिलेली असून जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांनी याबाबतचा पाठपुरावा केला होता. संपुर्ण तालुक्याचे भौगोलिक क्षेत्रफळ एकीकडे व टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी या दोन जिल्हा परिषद गटाचे क्षेत्रफळ तितकेच मोठे असल्याने ४० ते ५० किलोमीटर अंतरावरुन लोकांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पारनेर पोलिस स्टेशन गाठावे लागत असत. सदर टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी हा आदिवासी पट्टा व अतिशय दुर्गम परिसर असल्याने टाकळी ढोकेश्वर व ढवळपुरी परिसरातील लोकांचे प्रश्न यामुळे सुटणार आहेत. लवकरच या नुतन पोलिस स्टेशनचा समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याचे सुजित झावरे पाटील यांनी सांगितले.
यावेळी टाकळी टोकेश्वर येथे स्वतंत्र पोलिस स्टेशनला मंजुरी दिल्याबद्दल राज्य शासनाचे मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा.ना.देवेंद्र फडणवीस , अहमदनगर जिल्हयाचे पालकमंत्री मा.ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे पारनेर तालुक्यातील जनतेच्या वतीने आभार मानले.