आनंदाचे ‘योग्य’ क्षण टिपण्यासाठी ,मोबाईल फोटोग्राफी शिका……!सोलापूरत आगळावेगळा मोफत उपक्रम

श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन
आणि पद्मशाली युवक संघटनेचा उपक्रम
..
सोलापूर दि ७ आपल्या आयुष्यातील अनमोल क्षण प्रत्येक फोटोंच्या माध्यमातून साठवून ठेवत असतो . सध्या प्रत्येकांकडे स्मार्टफोन आहे. आयुष्यात आनंदाचे चांगले क्षण तंत्रशुद्ध टिपण्यासाठी मोबाईल फोटोग्राफी शिका.. हा उपक्रम आयोजित केला आहे
सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन आणि पद्मशाली युवक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दि. ११ सप्टेंबरला आयोजित केल्याची माहिती युवक संघटनेचे अध्यक्ष अमर एक्कलदेवी आणि फाउंडेशनचे उपाध्यक्ष नागेश पासकंटी यांनी केले आहे.
फोटोग्राफी ही ‘कला’ आहे. सर्वांनाच अवगत होते. ते चुकीचे ठरेल. मग, यासाठी ‘विनामूल्य’ असलेल्या ‘योग्य मोबाईल फोटोग्राफी शिका’.. या उपक्रमात सर्वच समाजातील व्यक्ती मोफत शिकू शकतात. फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष गौरीशंकर कोंडा यांच्या पुढाकाराने हा उपक्रम होत आहे.पत्रकार श्री. शिवाजी सुरवसे आणि छायाचित्रकार श्री. यशवंत सादूल हे मोबाईल फोटोग्राफी मधील तंत्रज्ञान आणि योग्य टिप्स देणार आहेत.
११ सप्टेंबर रोजी सकाळी ११.०० कन्ना चौक जवळील विणकर बागेत आयोजन केले असून जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मोबाईल फोटोग्राफी मधील तंत्र शिका, असे आवाहन फाउंडेशनचे मार्गदर्शक गणेश पेनगोंडा, सल्लागार सुकुमार सिध्दम, उपाध्यक्ष श्रीनिवास कामुर्ती, लक्ष्मण दोंतूल, श्रीनिवास रच्चा, किशोर व्यंकटगिरी, अंबादास गुर्रम, मधुसूदन माचरला, अंबादास आधेली, गोविंद केंची, बालाजी कुंटला, नवनीत पोला आणि युवक संघटनेचे प्रेसिडेंट गोविंद चिंता, सरचिटणीस योगेश मार्गम, कार्याध्यक्ष तुषार जक्का, उपाध्यक्ष नागेश जिगजारला, सहचिटणीस अॅड. नरेंद्र भंडारी, खजिनदार विजय निली, प्रसिध्दी प्रमुख अजय आवार, मिरवणूक प्रमुख जगदीश वासम यांनी केले आहे.