नेवासा तालुका गटसचिव श्री पुंड यांचा सेवानिवृत्ती निमित्त सन्मान

सोनई-/प्रतिनिधी
नेवासा तालुका गटसचिव तालुका कार्यालयातील तालुका सचिव श्री. अशोक विश्वनाथ पुंड हे त्यांच्या ३५ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर दिनांक ३१/८/ २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले त्यांचा सन्मान गट सचिव संघटनेमार्फत ५ सप्टेंबर २०२२ रोजी नेवासा मार्केट शाखेच्या सभागृहात करण्यात आला
अध्यक्षस्थानी तालुका विकास अधिकारी श्री बाळासाहेब वाकचौरे तर प्रमुख उपस्थिती सहाय्यक निबंध क श्री. गोकुळ नांगरे, जिल्हास्तरीय समिती अहमदनगर कार्यालयातील कार्यालय अधीक्षक श्री मनोहर बनसोडे ,शासकीय लेखापरीक्षक श्री. विजय गुलदगड, श्री.गोटे ,साहेब तसेच सहकारी बँकेचे अधिकारी श्री सत्यवान खाटीक, श्री रमेश विधाटे, नागपुरे, तसेच सचिव संघटनेचे अध्यक्ष श्री भारत पाटील, श्री संभाजी चव्हाण, संदीप आदमाने, श्री . विठ्ठल खाटीक, प्रदीप वाकचौरे, सुभाष सरोदे ,व सर्व गटसचिव उपस्थित होते.
श्री पुंड यांनी त्यांचे भाषणात सांगितले की मी माझा ३५ वर्षाचा सेवाकाळ अधिकारी व सचिव यांचे समन्वयातून पार पडला असून मला नोकरीमध्ये क्लार्क सचिव सुपरवायझर व तालुका सचिव पदावर काम करण्याची संधी मिळाली सेवानिवृत्ती म्हणजे, एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू अशी परिस्थिती आहे. यापुढे माझा सहकाऱ्यांशी दररोजची भेट घडणार नाही .अशी खंत मनात आहे, अशी भावना व्यक्त केली.
याप्रसंगी सहाय्यक निबंधक श्री गोकुळ नांगरे यांनी श्री पुंड यांचे कामकाजाचे कौतुक केले.
अध्यक्ष भाषणात श्री. वाकचौरे म्हणाले, की श्री पुंड यांचे बद्दल शब्द अपुरे पडतात सहकारी बँक व गट सचिव यांच्यातील समन्वय साधुन काम जबाबदारीने व पूर्ण वेळ देऊन पार पाडले आहे.
श्री पुंड यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या जागी मनमिळाऊ व्यक्तिमत्व असलेले श्री आप्पासाहेब बोर्डे यांची नियुक्ती झाली असून त्यांचा सन्मान वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला
सूत्रसंचालन विठ्ठल खाटीक व प्रदीप वाकचौरे तर आभार प्रदर्शन विजय खंडागळे यांनी केले.
