वारकरी साहित्य परिषदेच्या नेवासा तालुका अध्यक्षपदी अभिषेक जाधव महाराज व महिला अध्यक्षपदी अपर्णा सोनार

विजय खंडागळे
सोनई – महाराष्ट्र राज्य वारकरी साहित्य परिषदेमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुकाध्यक्षपदी हभप अभिषेक जाधव महाराज यांची व महिला अध्यक्ष पदी अपर्णा सुभाष सोनार यांची एकमताने निवड .करण्यात आली.
त्यांच्या निवडीचे पत्र निवड वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील काकाजी यांच्या अध्यक्षतेखाली व महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रामदास आठवले सामाजिक न्याय मंत्री भारत सरकार यांच्या उपस्थितीत नुकतेच मुंबई येथे देण्यात आले
.हभप जाधव महाराज यांची तरुण पणाची क्रेझ समाजाला पुढे नेण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरत आहे,धार्मिक कार्यक्रमात ते सतत अग्रेसर राहतात,या कार्याची दखल घेत नेवासा तालुका अध्यक्ष पदाची धुरा ह भ प अभिषेक जाधव महाराज यांच्या खाद्यावर व महिला हरिपाठ मंडळाची धुरा अपर्णा सुभाष सोनार यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे.तसेच संघटनेच्या माध्यमातून समाज प्रबोधन , गाव तेथे हरिपाठ, मंडळ स्वच्छतेचा जागर ,अशा प्रकारचे विविध कार्यक्रम सतत राबवत आहेत.या निवडीचे वारकरी संप्रदाय मधील पदाधिकारी,विविध मान्यवरांनी अभिनंदन केले आहे.