मुळा सहकारी बँकेचे नूतन चेअरमन माणिकराव होंडे यांचा माका येथे सत्कार

दत्तात्रय शिंदे/माका प्रतिनिधी
मुळा सहकारी बँकेच्या चेअरमन पदी श्री माणिकराव होंडे यांची निवड झाल्याबद्दल माका गावातर्फे चेअरमन श्री माणिकराव होंडे यांचा माका येथे नागरी सत्कार करण्यात आला
यावेळी बोलताना गोकुळ भताने यांनी सांगितले की खऱ्या अर्थाने गडाख कुटुंबीयांनी तालुक्यातील बहुजन समाजातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांना सहकार क्षेत्रातील मोठ मोठ्या पदाची संधी देऊन खऱ्या अर्थानं बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्याची नेहमीच भूमिका घेतलेली आहे माका, पाचुंदा, देडगाव, महालक्ष्मी हिवरा सर्व ग्रामस्थांतर्फे जेष्ठ नेते यशवंतराव गडाख माजी मंत्री शंकररावजी गडाख तसेच माजी सभापती सुनीता ताई गडाख व युवा नेते उदयन दादा गडाख यांचे मनापासून आभार मानले
. याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी चेअरमन भगवान गंगावणे, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खंडू भाऊ लोंढे यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले यावेळी माजी पोलीस पाटील किसन भानगुडे ,मुळा कारखान्याचे संचालक लक्ष्मण पाटील पांढरे, श्री रामदास घुले ,एडवोकेट गोकुळ भताने, युवा नेते संभाजी लोंढे ,सचिन देवकाते, सतीश लोंढे ,भानुदास म्हस्के, खंडू भाऊ लोंढे ,सुभाष गाडे ,प्रल्हाद शेंडगे ,सत्यवान पटेकर, बाबासाहेब जंगले, बाबासाहेब हाके, बबनराव भानगुडे, बाबा पांढरे, दिगंबर शिंदे, गोवर्धन रुपनर, दत्तात्रय मदने ,महादेव खेमनर, आदींसह मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ हजर होते.या वेळी नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.
