
नांदुरच्या ग्रामस्थांच्या वतीने
सोनिया राजदेव यांची आ.लंकेकडे मागणी !
पारनेर प्रतिनिधी :
पारनेर जुन्नर तालुक्याला जोडणाऱ्या नांदूर पठार ते कोरठण खंडोबा देवस्थान मार्गे कान्हुर पठार रस्त्याच्या अवस्था दयनीय झाली असून या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी नांदूर पठार ग्रामस्थांच्या वतीने सोनिया रविंद्र राजदेव यांनी आमदार निलेश लंके यांच्या कडे केली आहे. यासंबंधीची लिखी निवेदन आमदार निलेश लंके यांना देण्यात आले असून नांदुर पठारसह जवळपास चार ते पाच गावातील विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या रस्त्यावरून येत जात असतात. तर खराब रस्त्या अभावी पारनेर आगाराच्या वतीने अनेक बस फेऱ्यासुद्धा बंद केलेले आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून त्याचे डांबरीकरण करण्यात यावी अशी लेखी मागणी सुद्धा आमदार लंके यांच्याकडे सोनिया राजदेव यांनी केली आहे. तर दुसरीकडे पुणे जिल्ह्याच्या हद्दीला लागून हा रस्ता असल्याने अनेक भाविकांना या रस्त्यावरून श्री क्षेत्र पिंपळगाव रोठा येथील श्री कोरठण खंडोबा येथे दर्शनासाठी ये – जा करावे लागत आहे. परंतु या रस्त्याच्या अवस्था दैन्य झाल्याने भाविकांना सुद्धा फार मोठा त्रास सहन करावा लागत असून अपघातांचे प्रमाण सुद्धा वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी सुद्धा या लेखी निवेदनात सोनिया राजदेव यांनी केली आहे.