सत्तेच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवून विकासाभिमुख कामे करू- सुजित झावरे पाटील

वाघवाडी, गावडेवाडी ते ढवळपुरी रस्ता कामाचा शुभारंभ
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
ढवळपूरी येथे सन २०२१-२ २च्या जिल्हा वार्षिक आराखड्यातून ३०५४ योजने अंतर्गत रा.मा 222 वाघवाडी, गावडेवाडी ते ढवळपुरी रस्ता मजबूतीकरण व डांबरीकरण करणे. १५.०० लक्ष रु. रस्त्याचे भूमिपूजन समारंभ जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी सुजित झावरे पाटील म्हणाले की, आजकाल राजकारणाची परिस्थिती बदलत चालली आहे. राजकारणाची सद्य परिस्थितीत पाहता सत्तेच्या माध्यमातून तालुक्यांतील लोकांचे प्रश्न सोडवून विकासाभिमुख कामे करून तालुक्याचा विकास करणे हे महत्वाचे आहे. सत्तेचा वापर करून लोकांचे प्रश्न सोडवून मार्गी लावणे. राजकारणात सत्ता ही कायम स्वरुपी राहत नसल्याने सत्तेच्या काळात विकासात्मक कामांवर भर दिला पाहिजे.
यावेळी कृषि उत्पन्न बाजार समितिचे माजी सभापती अरूणराव ठाणगे, अमोल साळवे, सरपंच सौ. नंदाताई गावडे, उपसरपंच बबनराव पवार सर, पोपटराव चौधरी, सुधाकर अण्णा गावडे, राजाराम ठोकळ, रमेश केदारी, दिपक भागवत, संभाजी ढेकळे, मच्छिंद्र व्यवहारे, सोपानराव सांगळे, बाबाजी चौधरी, बापू चौधरी, नानासाहेब चौधरी, बाजीराव ठोकळ, भाऊ भुसारी, भिकाजी वाघ, नवनाथ वाघ, चेतन शिंदे, निलेश चौधरी, नागेश शेळके, दीपक देशमुख, बाबासाहेब गावडे, कैलास शिंदे, संतोष वाघ, विश्वनाथ वाघ, बापूसाहेब शिंदे, सचिन भानगडे, उत्तम भनगडे, सदाशिव वाघ, गुलाब देशमुख, बन्सी कावरे, नितीन चत्तर, प्रकाश वाघ, नंदू वाघ, वैभव गावडे, अतुल वाघ, सखाराम नरसाळे, दादासाहेब गावडे, बबनराव नरसाळे, शिवाजीराव खोडदे, कानू पालवे, अतुल मोरे, बाबासाहेब अडसूळ, मंजा बाप्पू चौधरी, तसेच वाघवाडी, गावडेवाडी येथील ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.