अहमदनगर

मवेशी येथे प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धां व विज्ञान, गणित, कला प्रदर्शनाचे आयोजन…!

अकोले प्रतिनिधी

-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूर अंतर्गत अ.नगर जिल्ह्यातील शासकीय व अनुदानित आश्रम शाळेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रकल्प स्तरीय क्रीडा स्पर्धांचे व विज्ञान गणित कला प्रदर्शनाचे शैक्षणिक संकुल मवेशी ता.अकोले.जि.अ.नगर येथे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती प्रकल्प अधिकारी श्री.राजन पाटील यांनी दिली. 

दि.6 ते 8 डिसेंबर दरम्यान प्रकल्प स्तरीय क्रीडास्पर्धेत 36 शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील एकुण 1300 विद्यार्थ्यी  विविध क्रीडाप्रकारात आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.तसेच आश्रम शाळा विद्यार्थ्यांत वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा व आदिवासी लोककला व पारंपारिक लोकसंस्कृतीचे संवर्धन व्हावे म्हणून सांस्कृतिक कार्यक्रम व चित्र,शिल्प, काष्ट चित्र प्रदर्शनाचेही क्रीडास्पर्धेबरोबर आयोजन करण्यात आले 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button