स्वतःची सन्मार्गाने उन्नती करताना समाज हिताचा विचार करावा – ह भ प दीपक महाराज देशमुख

राजूर, ता.७ :कष्ट व कौशल्याने कमावून स्वतःची सन्मार्गाने उन्नती करताना समाज हिताचा निश्चित विचार करावा असे प्रतिपादन ह भ प दीपक महाराज देशमुख यांनी श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात केले .यावेळी व्यासपीठावर जेष्ठ नागरिक राजेंद्र अप्पा पन्हाळे,माजी प्राचार्य श्रीनिवास एलमामे,सचिव शांताराम काळे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्रीराम पन्हाळे ,एलआयसी (शाखाधिकारी ) महेश कांबळे ,विकास अधिकारी श्रीनिवास वाणी ,अमोल वैद्य गणपत देशमुख ,संतोष बनसोडे, नितीन चोथवे ,गोकुळ कानकाटे,शेखर वालझाडे ,उपस्थित होते . यावेळी श्रीराम पन्हाळे,अमोल वैद्य याना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
श्री स्वामी समर्थ सेवा संस्थेच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एलआयसी तर्फे इयत्ता पाचवी ते बारावी मधील प्रथम क्रमांक येणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला . ह.भ. प. दीपक महाराज देशमुख यांनी एलआयसी च्या विविध उपक्रमांचे कौतुक केले गुणवंत विद्यार्थ्यांना कौतुकाची थाप दिली तर इतर विद्यार्थीही प्रेरणा घेऊन स्पर्धेत टिकतात. त्यांनीही खूप अभ्यास करून स्पर्धेत टिकण्यासाठी खूप अभ्यास करावा. खूप यश मिळवावे. जीवनात मोठे होताना स्वतःबरोबर समाजाचा विचार करावा. समाज ऋणातून मुक्त होण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी योगदान द्यावे. जसे धरणाला दरवाजे असतात, योग्य वेळी त्यात पाणी साठवले जाते व गरजेचे वेळी इतरांना पुरविले जाते .तसेच जीवनात कमाई करत असताना ती साठवावी व योग्यवेळी योग्य ठिकाणी तिचा विनियोग करावा असे त्यांनी सांगितले. विविध उदाहरणांमधून व दृष्टांतामधून त्यांनी विद्यार्थ्यांचे प्रेरणादायी प्रबोधन केले. शाळेतील विविध उपक्रम व गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. यावेळी विकास अधिकारी श्रीनिवास वाणी यांनीही विद्यार्थ्यांना कथा सांगून मनोरंजक पद्धतीने मार्गदर्शन केले .एलआयसीचा अर्थ व जीवनातील नियोजनाच्या पद्धती सुंदर पद्धतीने समजावून दिल्या. यावेळी श्रीराम पन्हाळे व अमोल वैद्य यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करण्यात आला. श्रीराम पन्हाळे व नितीन चोथवे यांनी विद्यार्थ्यांना सहा ड्रेस भेट दिले. चौकट.. त्याचवेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राजू शेठ (आप्पा) पन्हाळे यांनी विद्यार्थ्यांना दर्जेदार व मनोरंजक पद्धतीने शिक्षण मिळण्यासाठी शाळेला आपले वडील दशरथ पन्हाळे यांच्या नावावर डिजिटल क्लासरूम देण्याची घोषणा केली. विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. व जयघोष केला
वृक्षारोपणाच्या लागवड व संवर्धनासाठी श्री स्वामी समर्थ सेवा संस्था नेहमीच आग्रही असते. शिक्षक दिनाच्या निमित्ताने प्रत्येक शिक्षक व कर्मचाऱ्याला एक कुंडी एक झाड हा अभिनव उपक्रम राबविला. प्रत्येकाला एक झाड व एक कुंडी सप्रेम भेट देऊन त्याचे संवर्धन करावे अशी इच्छा व्यक्त केली. शिक्षकांना एक कुंडी एक झाड दिल्यानंतर विद्यार्थ्यांनीही त्यातून प्रेरणा घेऊन आम्ही घरी एका कुंडीत एक झाड नक्की लावू असा सूर आळवला. यावेळी , बँक ऑफ महाराष्ट्र चे व्यवस्थापक सोनवणे, अशोक वराडे हे उपस्थित होते. प्रास्ताविक प्राचार्या सौ मंजुषा काळे यांनी केले. सूत्रसंचालन विनायक साळवे यांनी केले तर आभार साहेबराव कानवडे यांनी मानले.फोटो
