इतर

निघोज परिसरात कचरा निर्मूलनसाठी प्रयत्न करण्याची गरज- रुपेश ढवण


दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
पारनेर:-निघोज परिसरातील पुष्पावती नदीत जो कचरा व विषेश करुण मासांहारी पदार्थांचा कचरा टाकला जातो त्याचे निर्मुलन करण्याची व त्या ठिकाणी हा मासांहारी पदार्थांचा कचरा न टाकण्यासाठी उपाययोजना ग्रामपंचायतने करण्याची गरज असल्याची मागणी युवा नेते रुपेश ढवण यांनी केली आहे. नुकत्याच झालेल्या एका दशक्रिया विधी कार्यक्रमात काक स्पर्श होण्यास बराच विलंब झाला त्यावेळी ढवण यांनी उपस्थित लोकांना हे आवाहन करुण ग्रामपंचायतने यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दशक्रिया विधी सुरू असताना श्रद्धांजली कार्यक्रम संपून सुद्धा काकस्पर्श होत नाही हे पाहून काकस्पर्श झाल्याशिवाय दशक्रिया विधी कार्यक्रम संपनार नाही अशी भूमिका काहींनी घेतली यावेळी बराच विलंब झाल्यानंतर ढवण यांनी आपली भुमिका विषद करताना सांगितले की या पुष्पावती नदीमध्ये गेली अनेक वर्षांपासून कचरा आणी यामध्ये विषेश करुण मासांहारी पदार्थांचा कचरा मोठ्या प्रमाणात टाकला जातो यामध्ये कोंबड्यांचे पिसे तसेच मच्छीचा वाया गेलेले पिसे मोठ्या प्रमाणात टाकले जातात. याची दुर्गंधी तर या ठिकाणी सातत्याने येतच असते. शिवाय कोंबडीचे पिसे वाऱ्यामुळे स्मशानभूमीत सातत्याने येत असतात. दशक्रिया विधी व अंत्यविधी साठी येणाऱ्या लोकांना तसेच वडनेर,शिरापूर तसेच वाडीवस्तीवर जाणाऱ्या व येणाऱ्या हजारो लोकांना या दुर्गंधीचा त्रास सातत्याने होत असतो. तसेच याठिकाणी जो मासांहारी पदार्थांचा कचरा टाकला जातो त्यावर परिसरातील कावळे मोठ्या प्रमाणात ताव मारतात जेणेकरून दशक्रिया विधी दिवशी हे कावळे मांसाहारी पदार्थ कचरा सातत्याने खात असल्याने काक स्पर्श करण्यासाठी येत नाहीत पर्यायाने काक स्पर्श होण्यास विलंब होतो व त्यासाठी नैवेद्य गाईला दाखवण्याचा कृत्रिम विधी करीत दशक्रिया विधी उरकून घेणे भाग पडते. अशा वेळी काक स्पर्श झाला नाही कुटुंबाला भविष्यात आडचण निर्माण होऊ नये यासाठी नाशिकला जाउन विधी करणे भाग पडते हा विधी सर्वसामान्य जनतेला आर्थिक दृष्ट्या परवडत नाही. यासाठी एकच उपाय आहे.तो म्हणजे या पुष्पावती नदीमध्ये कोनत्याही प्रकारचा कचरा टाकू देण्यास तातडीने बंदी करावी यासाठी निघोज ग्रामपंचायतीने पुढाकार घेण्याची गरज असल्याची मागणी ढवण यांनी केली आहे.



ढवण यांनी दशक्रिया विधी मध्ये ही मागणी करताच उपस्थितांनी ढवण यांच्या मागणीचे जोरदार समर्थन करीत ढवण यांचे कौतुक केले. हा दुर्गंधीयुक्त कचरा पुष्पावती नदीमध्ये टाकला जाउ नये यासाठी अनेक सामाजिक संघटनांनी विरोध केला आहे. मात्र मासांहारी पदार्थांची विक्री करणाऱ्या दुकानदारांची संख्या जास्त आहे. त्यामध्ये सर्वधर्मीय लोक आहेत. हा कचरा नदीत टाकल्याने दुर्गंधी सुटते. त्याचा त्रास सर्वांनाच होतो असे असूनही त्यावर उपाययोजना होत नाही. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाचा ८५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून ते काम सध्या बंद आहे. यावर ग्रामसेवक दत्तात्रय वाळके यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित ठेकेदाराने या प्रकल्पाचा कामाचा आराखडा सादर न केल्याने हे काम बंद असल्याचे सांगितले आहे. हे काम पुर्ण होत नाही तोपर्यंत तरी हा कचरा या ठिकाणी टाकला जाउ नये अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे


मटन मच्छी व्यावसायिकांनी गावाबाहेर एकाच ठिकाणी ही दुकाने सुरू करण्याची गरज आहे. निघोज व परिसरात यात्रा जत्रा उत्सव मोठ्या प्रमाणात होत असतात. शिवाय गाव व परिसरातील वाड्या वस्त्यावर अखंड हरिनाम सप्ताह साठी लाखों रुपये खर्च करुन नामवंत किर्तनकारांची किर्तने होत असतात मात्र मटन विक्री मारुती मंदिरासमोर केली जाते. हा प्रकार तातडीने बंद न झाल्यास याचा वाईट परिणाम होऊ शकतो हा इशारा धार्मिक संघटनेने दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button