गुरू अज्ञानाच्या अंध:कारात ज्ञानाचा प्रकाश देतात-एस.टी.येलमामे
गुरूवर्य रा.वि.पाटणकर विदयालयात शिक्षक दिन साजरा.
अकोले प्रतिनिधी
गुरू ब्रम्हा गुरूर्विष्णू,गुरूर्देवो महेश्वर. गुरू:साक्षात परंब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमःया पंक्तीप्रमाणे शिखरा पर्यंत नेणाऱ्या क्षमता आणि कर्तव्यनिष्ठेने परिपुर्ण गुरू हा तो दीप आहे.जो अज्ञानाच्या अंधःकारात आपल्याला ज्ञानाचा प्रकाश देतो.असे प्रतिपादन सत्यनिकेतन संस्थेचे जेष्ठ संचालक एस.टी.येलमामे यांनी केले.
गुरूवर्य रा.वि.पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय राजूर येथे विदयालयाचे प्राचार्य बादशहा ताजणे यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षक दिन उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी श्री.येलमामे प्रमुख अतिथी म्हणून विचार मंच्यावरून बोलत होते.
याप्रसंगी उपप्राचार्य दीपक बुऱ्हाडे,विभागप्रमुख प्रा.रविंद्र मढवई,विदयार्थी प्राचार्या अपेक्षा मढवई,गौरी भागवत,उपप्राचार्य आदित्य तळेकर,समृद्धी लहामगे यांसह सर्व शिक्षक,विदयार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
श्री.येलमामे यांनी पुढे मार्गदर्शन करताना परिवर्तनाचे माध्यम म्हणजे शिक्षक,विकासाचा मंत्र म्हणजे शिक्षक म्हणूनच शिक्षक तसेच आई, वडील यांचा आदर ठेवा.ध्येय निश्चित करा.असे विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य बादशहा ताजणे यांनी सामर्थ्यवान बनायचे असेल तर विचारांनी बना,कारण तुमचे महान विचार इतिहास बदलू शकतात. संकटे आपल्याला आडवायला येत नाही तर ते आपली उंची वाढवायला येतात.म्हणून एक सुंदर व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक सुंदर व्यक्तिमत्व म्हणून जगा असे विचार प्रतिपादीत केले.
प्रा.सचिन लगड यांनी जिवनातील पाहिली गुरू आई ही ज्ञानाचे पहिले विद्यापिठ आहे.शिक्षक दिनाला भारतीय संस्कृतीत अधिक महत्व आहे.कारण जीवनाला दिशा देण्यात व आपली जडण घडण करण्यात गुरूचा वाटा खुप मोठा असल्याचे विचार व्यक्त केले.
विदयार्थी शिक्षक प्रतिक विधाटे,कृतिका पवार,समृद्धी लहामगे,गौरी भागवत,अपेक्षा मढवई यांनी गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
यावेळी अध्यक्षीय सुचना संस्कृती देशमुख हिने मांडली.या सुचनेस प्रतिक्षा हंगेकर हिने अनुमोदन दिले. प्रास्ताविक समिक्षा लहामगे हिने केले.
स्वागत उपप्राचार्य दीपक बुऱ्हाड यांनी केले. प्रथमतःभारतरत्न डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन,ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले.
दिवसभर विद्यार्थी प्राचार्या अपेक्षा मढवई,गौरी भागवत, उपप्राचार्य आदित्य तळेकर, समृद्धी लहामगे यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विदयार्थी शिक्षकांनी विद्यालयाचा ताबा घेत संपूर्ण कामकाज सांभाळले. सुत्रसंचलन गोरख लहामटे याने केले. तर विभाग प्रमुख प्रा.रविंद्र मढवई यांनी उपस्थितांचे आभार मानले.