राज्यस्तरीय अबॅकस अकॅडमी राजूर च्या विद्यार्थ्यांनी मारली बाजी

अकोले प्रतिनिधी
मेगा माईंड एज्युकेशन तर्फे दर वर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अबॅकस आणि वेदिक गणितं स्पर्धेचे आयोजन संगमनेर येथे करण्यात आले होते.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून अकोले मतदार संघाचे विद्यमान आ डॉ.किरण लहामटे यांची उपस्थिती लाभली. त्यांनी चिमुकल्या विद्यार्थ्यांना खूप मोलाचे मार्गदर्शन केले तसेच अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जलसंपदा विभाग माजी उपविभागीय रामनाथ आरोटे , हे होते. तर प्रदेश अध्यक्ष रामदास सोनवणे यांची उपस्थिती लाभली.सोनवणे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून यशस्वी विद्यार्थ्यांना खूप छान मार्गदर्शन केले.
यामध्ये एक्स्पर्ट अबॅकस आणि वैदिक गणित अकॅडमी राजूर यामधील विद्यार्थ्यांनी बाजी मारली ,
वैदीक गणित मध्ये साई रमेश कानकाटे यानी प्रथम क्रमांक पटकावून कौतुकास पात्र ठरला. साईश संतोष कोंडार याने दुसरा क्रमांक तर ओंकार अशोक भांगरे याने तिसरा क्रमांक मिळविला. तसेच प्री बेसिक गट मधून बाळू गभाले या चिमुकल्या मुलीने प्रथम क्रमांक पटकावला मिहिका बाळू गभाले हीने गट अ मधून प्रथम क्रमांक तर श्लोक मनोज दहितूले याने दुसरा क्रमांक मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या सर्व मुलांनी उपस्थितांना आपल्या हुषारीची चुणूक दाखवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
मान्यवरांनी या सर्वच मुलांचे खूप कौतुक केले.. एक्स्पर्ट अकॅडमी राजूर चे संचालक दिनेश घोलप तसेच कावेरी घोलप मॅडम यांनी या मुलांसाठी खूप मेहनत घेतल्यामुळे यश संपादन करता आले .राजूर यासारख्या छोट्याशा गावामध्ये ते वैदिक गणित आणि अबॅकस सारखे क्लासेस घेऊन मुलांचे भविष्य घडवण्याचा एक प्रयत्न करत आहेत पुढील भविष्यासाठी सर्वच मुलांना मेगा माईंड एज्युकेशन चे संचालक शमनोज जावरे तसेच किरण जावरे मॅडम यांनी खूप आशीर्वाद दिलेत. कार्यक्रमासाठी मेगा माईंड टीम मेंबर सोनाली पावसे,अनिता पावसे, विजय घोलप, अंकिता शिंदे आणि मनीषा महाजन यांनी परिश्रम घेतले.
