सावित्रीबाई फुले बालसंगोपन चे अनुदान मिळेना!

बीड – कोव्हिडं मध्ये अनाथ झालेल्या बालकासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजना शासनाकडून राबविली जाते.या योजने करीता 25 जूलै.23 रोजी शासनाने शासन निर्णय निर्गमीत करून 54 कोटीचे अनुदान आयुक्त, महिला बालविकास कार्यालय पुणे या कार्यालयाकडे वर्ग केले
या कार्यालयाकडे अनुदान ऊपलब्ध असूनही या कार्यालयाने एप्रिल 2023 ते सप्टेबर 2023 या सहा महिन्याचे 9 महिन्याचा कालावधीत संपत आला तरी बालसंगोपनच्या एकूण 70 हजार बालकांच्या पालकांच्या बँक खाती जमा केली नाही
राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष यांनी वांरवांर पत्रव्यवहार करूनही 70 हजार बालकांच्या गेली न ऊ महिन्याचा कालावधी संपत आलेला असतानाही रक्कमा जमा करण्यात आलेल्या नाहीत. सदर लाभार्थ्यांचे रक्कमा जमा करण्याची मागणी राष्ट्रीय जनसेवा पक्षाचे बीड जिल्हा अध्यक्ष दिलीप राऊत यांनी केली आहे.