216 मिडीयम रेजिमेंट चा ५७ वा स्थापना दिवस उत्साहात साजरा.

मराठा बटालियन यांची गौरवशाली परंपरा-राकेश ओला
दत्ता ठुबे/अहमदनगर
-216 मिडीयम रेजिमेंटच्या स्थापना दिवसानिमित्त सर्व आजी-माजी सैनिकांना शुभेच्छा. भारतीय सैन्य दलात मराठा बटालियन यांची गौरवशाली परंपरा आहे.1971 साली भारत पाकिस्तानच्या युद्धात 216 मिडीयम रेजिमेंटच्या सैनिकांनी अभूतपूर्व पराक्रम केला आहे. देशसेवेच्या कार्यात सैनिकांचे मोठे योगदान आहे असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी केले .
हॉटेल संजोग येथे अहमदनगर जिल्ह्यातील आजी माजी सैनिकांचा मेळावा व 216 मिडीयम रेजिमेंट चा स्थापना दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.याप्रसंगी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला बोलत होते.याप्रसंगी कार्यक्रमाच्या प्रमुख उपस्थितीत कर्नल व्हि.डी.पोट्टी,कर्नल वेणुगोपाल,कर्नल डॉ.मोहन रोटे, व्हि.के.शर्मा,कॅप्टन के.एन.गिरी, सुभेदार मेजर एन के पाटील,एन के पाटील,सुभेदार मेजर के.व्ही.भोसले,अहमदनगर आजी माजी सैनिक संघटना ऑर्डनरी कॅप्टन गंगाधर चेमटे,चिलगर, शिवाजी गिरवले आदी उपस्थित होते. कर्नल व्हि.डी.पोट्टी म्हणाले, सेवानिवृत्त सैनिकांनी आपल्या परिवारासाठी वेळ द्यावा.सैन्य दलात सेवेत असताना परिवारासाठी वेळ देता आला नाही. ज्या ठिकाणी नोकरी करत आहात तेथे देशाच्या गौरवासाठी कार्य करावे व जीवनात यशस्वी व्हावे. कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलाने करण्यात आली.या कार्यक्रमात वीर माता, वीर पत्नी यांचा सत्कार करण्यात आला.या कार्यक्रमात संपूर्ण महाराष्ट्रातील आजी-माजी सैनिकांचा उस्फूर्त सहभाग होता.देशभक्तीपर गीतांनी वातावरण देशभक्तीमय झाले होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
अहमदनगर जिल्हा आजी माजी सैनिक संघटना,ऑर्डनरी गंगाधर चेमटे,शिवाजी गिरवले,घन:शाम खराडे,आदिनाथ फासले,भरत खाकाळ,राजेद्र जगताप, नंदकुमार साठे,सुनिल तारडे, दुर्योधन जाधव,दिनकर गर्जे, अशोक कार्ले तसेच सर्व आजी माजी सैनिकांनी परिश्रम घेतले.
