खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदीर येथे गणपती बाप्पाला निरोप

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील खिरविरे येथील सर्वोदय विद्या मंदीर येथे गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला
श्री गणेशाला निरोप देताना सर्व विद्यार्थी आणि शिक्षक भावूक झाले होते मात्र खरतर सकाळी पहाटे पासूनच पावसाचा जोर वाढला होता नंतर अचानक पाऊस थांबला आणि सर्वांना इतका आनंद झाला की त्याला पारा वारा राहिला नाही, या सर्व कार्यक्रमाचे प्रमुख श्री धनंजय लहामगे सर, व विद्यालयचे प्राचार्य श्री परबत सर यांच्या मार्गदर्शन खाली पार पडली मिरवणुकी मध्ये
टाळ पथक श्रीमती वाळुंज कविता, शिंदे नानासाहेब, प्रवीण मालुंजकर टिपऱ्या, श्री धनंजय लहमगे सर, श्री सुधीर पराड, काठी चालवणे श्री बडाने सर, भांगडा नुत्य श्री परबत सर, लेझिम श्री सचिन लगड, विठल रुख्मिणी वेश बुषा, सोंगे श्री कोटे सर यांनी आपल्या विभागात विविध प्रकारचे कौशल्य दाखवले
प्रथम दिवशी श्री पर्वत सर यांच्या हस्ते पुजा करण्यात आली, या कार्यक्रमाला मूर्ती दाते श्री त्रंबक पराड,,ग्रा, सदस्य यांच्या हस्ते सत्य नारायणाचे पुजा करण्यात आले व शेवटच्या दिवशी गावातील व्यापारी श्री त्रंबक आवरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली श्री गणेश मिरवणूक अतिशय थाटमाट त भक्तिमय वातावरणात पार पडली या कार्यक्रमास विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी श्री धुमाळ सर, भदाने सर, वाळुंज कविता, शिंदे नानासाहेब, प्रवीण मालंजकर, भाऊसाहेब कोटे,सदगीर भास्कर, पंढरी बेनके, सुनील देशमुख, लगड सचिन, आंब्रे सर, डगळे सर ,पवार मामा ,भांगरे मॅडम ,भांडकोळी मॅडम, सुधीर पराड या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विभाग प्रमुख श्री धनंजय लहामगे सर व प्राचार्य श्री परबत सर यांनी आभार मानले, व गणपती विसर्जन गाव तलावात करण्यात आले
