गळनिंब च्या शिवारात गोदावरी नदी काठावर अनोळखी इसमाचा मृतदेह!

दत्तात्रय शिंदे माका प्रतिनिधी
नेवासा तालुक्यातील गळनिंब गावाच्या शिवारात गोदावरी नदीच्या काठावर अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला
प्रवरा संगम पोलीस दूरक्षेत्राच्या हद्दीत दि. ८/९/२०२२ रोजी सायं. ५.३०वाजेच्या सुमारास हा अनोळखी इसमाचा मृतदेहआढळून आला आहे. सदर इसमाचे वय अंदाजे ३२ ते ३८ वर्ष आहे अंगामध्ये काळ्या रंगाची पँट व काळया रंगाचा टी शर्ट, कमरेला लाल करदुडा, उजव्या हाताच्या मनगटावर केशरी रंगाच्या मनीच्या दोन राख्या आहेत.
गळनिंब गावचे पोलीस पाटील अमोल भास्कर शेळके यांनी दिलेल्या खबरीवरून नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूचा सी आर पी सी १७४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून इसमाचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. सदर मयत इसमाबद्दल काही माहिती असल्यास नेवासा
पोलीस ठाण्यात संपर्क करण्याचे आवाहन पो.नि.विजय करे (मो.नं.८६९८९७११७७), पो उप.नि. एस जी. ससाणे (८८०५१४२८९९) यांनी केले आहे.
दरम्यान मयत अनोळखी व्यक्तीच्या मृत्यू बाबत परिसरात उलट सुलट चर्चा सुरू आहे