जादुगार हांडे फौंडेशन ने केला गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

विद्यार्थ्यांनी शाळेचे नांव ऊज्वल करावे’- जादुगार हांडे
अकोले प्रतिनिधी
जादूगार पी.बी. हांडे सोशल फौंडेशनच्या वतीने आयोजित साईबाबा विद्यालय मन्याळे,(ता-अकोले) येथे सन 2020/2021/2022/या शैक्षणिक वर्षात 10 वीत प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला अध्यक्षस्थानी जेष्ठ पत्रकार व आदिवासी सेवक भाऊसाहेब मंडलिक हे होते

जादूगार पी.बी. हांडे सोशल फौंडेशन चे संस्थापक जादुगार हांडे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विद्यालयाचे नाव ऊज्वल करावे.संधीचे सोने करावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यां वर विज्ञानवादीच संस्कार करावेत. असा आशावाद व्यक्त केला.
अकोले.तालुका पत्रकार संघ अध्यक्ष सुनिल गिते यांनी संस्थेच्या या विद्यार्थ्यी प्रेरणादायक ऊपक्रमाचे कौतुक केले..
गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, सन्मान चिन्ह व रोख रक्कम देऊन यथोचीत गौरविण्यात आले. निकालाची ऊज्वल परंपरा कायम राखल्याबद्दल विद्यालय व शिक्षक वृंद यांना सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.
सुरूवातीस विद्यार्थ्यीनी सुंदर स्वागत गीत सादर केले.विद्यालयाचे मुख्याध्यापक .डोके सरांनी विद्यार्थ्यांच्या प्रगती विषयी माहिती दिली.शिक्षक प्रशांत गिते यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले मंदाकिनी हांडे यांनी अंधश्रद्धा निर्मूलन पर प्रबोधन गीत सादर केले.
या प्रसंगी जेष्ठ कार्यकर्त्या गंगुबाई फलके, दादासाहेब फलके, शिक्षक श्रीमती सहाणे मॅडम,श्रीमती देशमुख मॅडम ,खंडू जाधव आदी उपस्थित होते. यावेळी जादुगार हांडे फौंडेशन चे वतीने विद्यार्थाना खाऊ चे वाटप करण्यात आले
