जेष्ठ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे निधन

पुणे दि १० जेष्ठ संघ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी पुणे येथे शुक्रवारी( दि९) अल्पशा आजाराने निधन झाले
दि २०/९/१९२९ रोजी त्यांचा जन्म झाला.त्यांचे एम.ए.एल.एल.बी.शिक्षण झाले. साधारणपणे १९५१ च्या दरम्यान त्यांनी आसाम मध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम केले.प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी दादर, मुंबई येथे संघाचे काम केले.त्याच काळात साप्ताहिक विवेक मध्ये त्यांनी काही वर्ष काम केले.स्वताचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी ग्लॅक्सो इंडिया मध्ये नोकरी सुरू केली.तेथे एक्झिक्युटिव्ह (पर्सोनेल) म्हणून निवृत्त झाले.सेवा निवृत्ती नंतर ते पुण्यात स्थायिक झाले
.पुण्यात भारतीय मजदूर संघ,स्वरूप वर्धिनी,श्रम सेवा न्यास ,ग्राम विकास संस्था यांच्या कामाशी ते जोडलेले होते.अनेक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.गरजू व्यक्तींनाही शिक्षणासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते मदत करत असत.बुद्धीप्रामाण्य, तर्कशुद्ध विचार, अत्यंत संवेदनशीलता,गरीब व शोषित याच्या बद्दल कळवळा, मदतीचा स्वभाव, वक्तशीरपणा हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान बहीण पुतणे, पुतण्या,भाचे असा मोठा परिवार आहे.