कोतूळ येथे आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास व बाल सुसंस्कार शिबीर!

कोतुळ प्रतिनिधी
अकोले तालुक्यातील कोतुळ येथे आध्यात्मिक व्यक्तिमत्व विकास व भव्य निवासी बाल सुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
कोतुळेश्वर वारकरी शिक्षण संस्था कोतूळ यांचे वतीने श्री कोतुळेश्वर मंदिर, कोतूळ, ता.अकोले, जि.अ.नगर येथे या शिबिराचा शुभारंभ करण्यात आला
समाजप्रबोधनकार ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर ह.भ.प. संजय महाराज पाचपोर, ह.भ.प. रामनाथ महाराज जाधव, ह.भ.प. विवेक महाराज केदार व ह.भ.प. दिपक महाराज देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली हे शिबीर शुक्रवार दि. १० मे २०२४ ते : शनिवार दि. २५ मे २०२४ पर्यंत चालणार असल्याचे
ह.भ.प.दत्तात्रय महाराज भोर व ह.भ.प. नितीन महाराज गोडसे यांनी सांगितले
योगासन, व्यायाम, प्रार्थना,गीतापाठ,गायन,मृदुंग मार्गदर्शन,हनुमान चालिसा,श्रीमद् भगवतगीता, संस्कृत श्लोक, सुभाषीत पाठांतर, हरिपाठ पाठांतर व सुसंस्कार यावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे असून शिबीरात ४ थी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना यात प्रवेश देण्यांत आला असून अकोले तालुक्यातील अनेक विद्यार्थ्यांनी या शिबिरात नोंदणी केली आहे