सावाना’चा शिक्षक गौरव पुरस्कार प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांना जाहीर

‘
नाशिक: येथील सार्वजनिक वाचालय आणि नागरिक शिक्षक गौरव समितीच्या वतीने दिला जाणारा विशेष कार्य शिक्षक पुरस्कार यशवतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या मानव्यविद्या व सामाजिकशास्त्रे विद्याशाखेचे प्रभारी संचालक प्रा. डॉ. प्रवीण घोडेस्वार यांना नुकताच जाहीर झाला आहे.
कविश्रेष्ठ कुुमाग्रज यांनी सुरू केलेला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार गेल्या ५२ वर्षांपासून महापालिका क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना देण्यात येतो. येत्या २१ सप्टेंबर रोजी ज्येष्ठ पत्रकार डॉ. उदय निरगुडकर यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. प्रा. घोडेस्वार यांनी मुक्त विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक, राष्ट्रीय सेवा योजना विद्यापीठ समन्वयक अशा विविध पदांवर काम केले आहे. ते सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक विषयांवर विविध नियतकालिकांमधून लेखन करीत असतात. त्यांना यापूर्वी गाडगीळ पुरस्कार, लाडली मीडिया पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. सार्वजनिक वाचनालयाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, कुलसचिव डॉ. प्रकाश देशमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर सहकाऱ्यांनी प्रा. घोडेस्वार यांचे अभिनंदन केले आहे.