अबब! गाय विकली , १ लाख ११ हजार रुपये किंमतीला.

अकोले प्रतिनिधी .
शेतीला जोडधंदा म्हणून गोपालनाकडे पाहिले जाते यातून कुटुंबाचा घर खर्चाला हातभार लागतो त्यामुळे गावोगावी पशुपालनाचा व्यवसाय चांगला वाढला आहे यातून शेतकऱ्याची मोठी उलाढाल होते
पशुपालनातून अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथील शेतकऱ्याने स्वतःच्या गोठ्यातील पहिलारु कालवडीला तब्बल एक लाख अकरा हजार रुपयांना विकले .
मुळा परिसरात पहिल्यांदाच इतक्या उच्चांकी रकमेची गायीची खरेदी विक्री झाल्याबद्दल दूध उत्पादकांमधून या शेतकऱ्याचे कौतुक होत आहे. मुळा खोऱ्यातील धामणगाव पाट ता. अकोले येथील दुध उत्पादक शेतकरी वैभव आनंदा भोर यांचा शेतीबरोबर दूध उत्पादनाचा जोडधंदा आहे. उत्कृष्ट नियोजन व दर्जेदार संगोपन यामुळे त्यांच्या गोठ्यातील गायी विक्रमी दूध व दर्जेदार कालवडी पाहावयास मिळतात. श्री भोर यांच्या गोठ्यात अडीच वर्ष वयाची पहिलारु कालवड संगमनेर येथील व्यापाऱ्याने तब्बल एक लाख आकरा हजार रुपये देऊन खरेदी केली. विशेष म्हणजे आणखी दोन व्यापाऱ्यांनीही ती कालवड तितक्याच रकमेला मागितली होती.
मुळा पट्ट्यात प्रथमच इतक्या मोठ्या रकमेची गायीची खरेदी विक्री झाल्यामुळे दूध उत्पादकांमध्ये श्री भोर यांचे कौतुक होत आहे. सध्या चांगला भाव असल्याने दुधाच्या गाई व पहीलारु कालवडींना चांगली मागणी आहे.