वाट दाखवणाऱ्यां पेक्षा वाट लावणारे जास्त झालेत. ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम

अकोले ( प्रतिनिधी )
संत हे सर्वगुणी असतात, संत हे क्षमाशील असतात व संत हे क्षमा मागणारे असतात. वाट दाखवणारे पेक्षा वाट लावणारे जास्त झालेत. संतांच्या मार्गांवर चालले तर जीवनाचा उद्धार होतो. असे मत ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज कदम छोटे माऊली यांनी पंचम दिनाचे कीर्तन पुष्प गुंफताना व्यक्त केले.
तु माऊली हून मायाळ, चंद्राहून शीतल, पाण्याहून पातळ … कल्लोळ प्रेमाचा
या जगदगुरु तुकाराम महाराज यांचे अभंगावर निरूपण करताना कदम महाराज अमृतवाहिनी प्रवरा मातेच्या तीरावर वसलेल्या प.पू. सुभाष पुरी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अकोले तालुक्यातील कळस बू येथे गणेश उत्सवात ऋषिपंचमी ते वामन जयंती या पावन पर्व काळात आयोजित अखंड हरिनाम सप्ताह तथा ज्ञानेश्वरी पारायण सोहळा मध्ये बोलते होते.
श्री. महाराज म्हणाले की, महाराष्ट्रातील पहिली कर्ज माफी देणारे संत तुकाराम महाराज होय. सोन्याला सुगंध, हिरा कोमल, योगी निर्मल, कल्पतरू चालणे, हत्ती ने दूध देणे, श्रीमंत दयाळू, वाघ कृपालू, अग्नी शीतल, चंदन ला फुले या गोष्टी कधीच होऊ शकत नाही.
हभप मनोहर महाराज भोर, दिपक महाराज देशमुख, अगस्ती देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष के.डी धुमाळ, सोमनाथ महाराज भोर, रमेश महाराज भोर, चंद्रकात महाराज चौधरी, हौशीराम महाराज कोल्हे, माऊली आरोटे आदी उपस्थित होते.
यावेळी ह.भ.प. गणेश महाराज वाकचौरे, मृदंगाचार्य ह.भ.प. संकेत महाराज आरोटे, नितीन महाराज गोडसे, गायकवृंद अरुण महाराज शिर्के, रविदास महाराज जगदाळे, प्रवीण महाराज पांडे हार्मोनियम वादक डॉ. विकास वाकचौरे, विणेकरी गंगा बाबा वाकचौरे हे उपस्थित होते.
ह.भ.प. सुदाम महाराज कोकणे, धांदरफळ यांनी प्रवचन सेवा केली. ग्रामपंचयात सदस्य श्री. जिजाबा वाकचौरे व पत्रकार गणेश रेवगडे यांनी संतपंगत दिली.