इतर

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना लासलगाव येथे अभिवादन!

प्रतिनिधी

डॉ शाम जाधव

लासलगाव आज दिनांक ६/१२/२०२४ रोजी महामानव परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना ६८ व्या महापरिनिर्वाण दिना निम्मीत लासलगाव शहरातील समाजबांधव व नागरिकांनी आज सकाळ पासूनच डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठीकाणी जाऊन त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करतांनाचा प्रसंग आज लक्षवेधी ठरला

प्रत्येक जण आज आप आपल्या परिणे त्याच्या प्रतीमे समोर नतमस्तक होत होता यातून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे आपल्यावर अनंत ऊपकार असल्याची जाणीव प्रत्येकाच्या चेहर्यावर दिसत होती
लासलगांव पोलिस उपनिरीक्षक मा जनार्दन शिंदे( सर) यांनी देखील पथकाच्या वतीने डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले भारतीय बौद्ध महासभा लासलगाव शहर शाखेच्या वतीने, यशोधरा व रमाई महीला मंडळ यांच्यातर्फे सामुहिक त्रिसरण पंचशीलाचे पठण करण्यात आले अभिवादनप्रसंगी बौद्धाचार्य प्रकाश संसारे यानी डॉ बाबासाहेब यांचे विचार परिसारारखे असुन जो त्या विचारांचे ग्रहण करेल त्याच्या आयुष्याचे सोने झाल्याशिवाय राहणार नाही असे विचार व्यक्त केले.


डॉ बाबासाहेब आंबेडकर यानी देशाला अर्पण केलेले संविधान हा आपल्या देशाचा सर्वात मोठा ग्रंथ आहे आणि या भारतीय संविधानाच्या मार्गदर्शक तत्वांवरच हा देश समाजातील अगदी शेवटच्या घटकाचा सर्वतोपरी विचार करुन प्रगतीच्या शिखरावर जाउ शकतो असे आरतीताई भालेराव यानी अभिवादनप्रसंगी विचार मांडले सदर कार्यक्रमाप्रसंगी विवीध आंबेडकरी चळवळीतील सामाजीक धार्मिक राजकिय क्षेत्राातील कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाप्रसंगी डॉ अमोल शेजवळ ,मनोहर आहिरे ,साहेबराव केदारे,भोला पवार ,नाना बनसोडे,नाना सूर्यवंशी,संतोष गांगुर्डे,अमित गजरमल,बाळु सोनवणे तसेच
महिलावर्गात सुशिलाताई शेजवळ ,भारती शेजवळ ,मनिषा शेजवळ ,ज्योती शंभरकर, रमनबाई शेजवळ ,कविता शेजवळ आदि उपस्थित होते .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button