सोलापुरात महिलां साठी “आडवाल्लू मिकू जोहारलू” उपक्रम!

.
सोलापूर प्रतिनिधी
अनेक महिला खाजगीत कुठल्याही बाबतीत सविस्तरपणे माहिती देऊ शकतील आणि बोलूही शकतीलच. पण, व्यासपीठावर उपस्थित राहून भाषण करणे किंवा इतर माहिती देणे म्हणजे थरकाप आणि भंबेरी उडतोच. कोणी काहीतरी बोलतील या भितीने गप्पच असतात. अशांसाठी सोलापूरातील श्री मार्कंडेय सोशल फाउंडेशन संचलित पद्मशाली सखी संघमच्या वतीने ”आडवाल्लू मिकू जोहारलू” अर्थातच ‘महिलांनो तुमच्या कर्तुत्वाला सलाम’.. या उपक्रमांतर्गत भाषण कसे करावेत.? याबाबत सविस्तर माहिती व भाषण कला आत्मसात करण्यासाठी पद्मकन्या पुरस्कार विजेत्या सौ. अपर्णाताई लोला या देणार आहेत, अशी माहिती पद्मशाली सखी संघमच्या उपाध्यक्षा सौ. संध्याराणी अन्नम यांनी दिली
‘विनामूल्य’ असलेल्या ‘भाषण कसे करावेत’ हा उपक्रम शनिवार, दि. १७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ठीक (शार्प) ५ वाजता पूर्व भागातील दाजीपेठ येथील श्रीराम मंदिर येथे आयोजन करण्यात आले आहे. भाषण कला आत्मसात कसे करायचे..? याबाबत महत्त्वाचे टीप्स दिले जाणार आहे. यामुळे भविष्यात यशस्वी कार्यक्रमाचे’ वक्ता’ म्हणून गणले जाऊ शकता.
पद्मशाली सखी संघमच्या वतीने मोफत असलेल्या यशस्वीपणे ‘भाषण कला कसे आत्मसात करावेत..! या उपक्रमांत जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन सखी संघमच्या अध्यक्षा सौ. माधवी अंदे, सचिवा सौ. राधिका आडम, सहसचिवा सौ. जमुना इंदापूरे, कार्याध्यक्षा सौ. वैशाली व्यंकटगिरी, सहकार्याध्यक्षा लक्ष्मी चिट्याल, खजिनदार सौ. प्रभावती मद्दा, सहखजिनदार सौ. ममता मुदगुंडी यांनी केल्या आहेत.