श्री क्षेत्र कोरठण खंडोबा यात्रोत्सवात पशुहत्या व गॅस सिलिंडरला बंदी!

देवस्थान परिसरात आपत्ती व्यवस्थापन व आरोग्य कक्ष
दत्ता ठुबे/पारनेर प्रतिनिधी
प्रतिजेजुरी श्री.क्षेत्र कोरठण खंडोबा देवस्थान पिंपळगाव रोठा येथील पौष पोर्णिमेला ६ जानेवारी पासून २ दिवशीय यात्रोत्सव होत असून देवस्थान व प्रशासन यांची संयुक्त बुधवारी कोरठण खंडोबा देवस्थान सभागृहात पार पडली.या यात्रोत्सव काळात
अग्निशमन दलाची गाडी व रूग्णवाहिका २४ तास उपलब्ध करून देण्यात येणार आहे.व्हीआयपीसह इतर मान्यवरांसाठी अक्कलवाडीचा रोड वापरण्यात येणार आहे.या यात्रोत्सव मानाच्या ब्राम्हण वाडा व बेल्हा काठी व पालखी मालकांबरोबर चर्चा करण्यात आली.त्यामुळे या मानाच्या काठ्या कळसाला व मंदिर गाभारात मान दिला जाणार आहे.त्यामुळे त्यावरुन वाद घालु नये असे आवाहन पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले आहे.९ मानाच्या पालखी वाले मानकरी या बैठकीत उपस्थित होते.तर दुसरीकडे मंदिर परिसरात अर्धा किलोमीटर पर्यंत सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहे तर या यात्रोत्सव गॅस सिलिंडर पशुहत्या बंदी घालण्यात आली असल्याचे ज्येष्ठ विश्वस्त राजेंद्र चौधरी व माजी सरपंच अशोक घुले यांनी सांगितले यांनी सांगितले.
तर दुसरीकडे पोलिस दलाच्या वतीने दोन कंट्रोल रुम उभारण्यात येणार आहे.चारचाकी व दुचाकी वाहनांसाठी व्यवस्था स्वतंत्र करण्यात येणार आहे.या यात्रोत्सव नियोजनाची बैठक बुधवारी निवासी नायब तहसीलदार गणेश आढारी पोलीस निरीक्षक घनश्याम बळप गटविकास अधिकारी किशोर माने राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक अप्पासाहेब बनकर उपनिरीक्षक उमेश ढोले आगार व्यवस्थापक पराग भोपळे यावेळी देवस्थानच्या अध्यक्षा सौ.शालिनी अशोक घुले उपाध्यक्ष महेश भास्कर शिरोळे खजिनदार तुकाराम बाळाजी जगताप सचिव जालिंदर महादू खोसे सहसचिव कमलेश अर्जुन घुले यात्रा कमिटी अध्यक्ष.सुरेश पांडुरंग फापाळे पिंपळगाव रोठा गावचे उपसरपंच व विश्वस्त दादाभाऊ पांडुरंग पुंडे माजी सरपंच अशोक घुले देवस्थानचे विश्वस्त.राजेंद्र भिका चौधरी सौ.सुवर्णा अतुल घाडगे.दिलीप रामचंद्र घुले मंडलाधिकारी पंकज जगदाळे तालुका आरोग्य अधिकारी डॉ सुदाम बागल डॉ प्रतिक शिंदे जी.ई.शिंदे आर.एस .शिंदे यांच्या सह विविध विभागाचे अधिकारी दिलीप जगताप स्वप्नील जगताप ,किरण शेलार प्रदीप खोसे यांसह यात्रेच्या नियोजनाबाबत संबंधित विविध खात्यांचे प्रमुख उपस्थित होते. कोरठण गडावर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांची सार्वजनिक विभागाकडून डागडुजी करण्यात येणार असून भाविकांच्या वाहनांना अडथळा येणारी रस्त्याच्या कडेची अतिक्रमने काढण्यात येणार आहेत. तसेच यात्रेच्या काळात एसटी महामंडळाकडून जादा बसेस सोडण्यात येणार असून पारनेर, कान्हुर पठार, टाकळी ढोकेश्वर, बेल्हे येथून बसेसचे नियोजन उत्कृष्ट पद्धतीने करण्यात येणार आहे.पोलीस विभागाकडून चोख बंदोबस्त पुरविण्यात येणार असून गृहरक्षक दलाचे जवान व पोलीस मित्र त्यांच्या सोबतील सहकार्य करण्यासाठी असणार आहेत. तसेच विज मंडळाकडून यात्रा कालावधीत विजेचा कोणताही खोळंबा होणार नसल्याचे सुचित करण्यात आले असून यात्रा कालावधीत विविध मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क व्यवस्थित चालू ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दल, आपत्कालिन विभाग यांना तातडीच्या आवश्यक सुविधा पुरविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून प्रत्येक विभागचे प्रमुख यात्रेच्या काळात उपस्थित राहून स्वतः लक्ष ठेवून असतील आशा सूचना देण्यात अळ्या आहेत. तसेच आरोग्य विभागाचे पथक २४ तास सेवेत राहणार असून सर्व अद्यावत सुविधांसह सर्वच विभाग सतर्क राहून यात्रा उत्साहात पार पाडतील असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे.
यात्रा उत्सवाचे प्रमुख आकर्षण मानाच्या पालख्या व मानाच्या काठ्यांची आकर्षक मिरवणूक हे असणार असून त्याबाबत प्रशासनाने जय्यत तयारी केली असून देवस्थानच्या वतीने त्यासाठी सुसज्ज व्यवस्था केली आहे. यात्रा सांगता पालख्यांच्या व गगनचुंबी काठ्यांच्या मिरवणुकीने होणार असून त्यासाठी सर्वच मंडळांना सूचना करण्यात आल्या असून त्याबाबत पुन्हा एक बैठक होणार आहे व त्यामध्ये विविध सूचना व तयारी बाबत आढावा बैठक होणार आहे. तसेच या आकर्षक मिरवणुकीसाठी लाखो भाविकांचा जनसमुदाय लोटणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने सर्वच विभागांना तत्पर राहण्याच्या सूचना दिल्या असून यात्रा नियोजनबद्ध व आनंदाने पार पडण्यासाठी ग्रामस्थानी व पंचक्रोशीने तसेच भाविकभक्तांनी सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.जगभरातील भाविक भक्तांना यात्रेचा आनंद घेता यावा यासाठी प्रशासनाच्या वतीने यात्रेचे चित्रिकरण करण्यासाठी देवस्थानाला परवानगी देण्यात आली असून यात्रेतील सर्वच कार्यक्रमांचे लाईव्ह चित्रिकरण करण्यात येणार आहे. तसेच देवस्थानच्या अधिकृत सोशल मिडिया साईटवर यात्रेचे चित्रिकरण व्हीडीओ व दररोजच्या कार्यक्रमांचे फोटो प्रदर्शित केले जाणार असून जगभरातील भाविकांना यावर्षीपासून यात्रेचा आनंद घेता येणार आहे. देवस्थानच्या वतीने जास्तीत जास्त भाविकांनी यात्रेसाठी उपस्थित राहुन सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

– भाविक महिलांनी लहान मुलांसह दागिने व मौल्यवान वस्तू सांभाळावे
पोलीस निरीक्षक घनश्याम बळप
पिंपळगाव रोठा येथील खंडोबा देवस्थानच्या तीन दिवशीय वार्षिक यात्रोत्सवात लाखो भाविक जिल्हा सह राज्यातुन येणार आहे.त्यामुळे महिलांनी आपल्या लहान मुलांसह आपले मौल्यवान वस्तू व दागिने सांभाळावे असे आवाहन पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले आहे.देवाच्या दरात दागिन्यांचे व मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन करू नये असे आवाहन पोलिस निरीक्षक घनश्याम बळप यांनी केले आहे.