कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात भारतीय मजदूर संघाचा 28 डिसेंबर ला विधानसभा वर मोर्चा
चंद्रपूर -कामगार कायद्यातील एकतर्फी बदल, कामगारांच्या कायम स्वरूपी रोजगारावर आलेली गदा, सरकारचा कामगारांच्या करिता असलेला उदासीन दृष्टीकोन महाराष्ट्रातील असंघीटत कामगारांना कोणत्याही प्रकारची सामाजिक सुरक्षा नसणे , विविध ऊद्योगातील वाढत चाललेली कंत्राटी कामगारांची मोठी संस्खा, घटत चाललेला कायम स्वरूपी नोकरी अशाच विविध प्रश्नांवर संघटित व असंघीटत *कामगारांच्या मागण्यां करिता भारतीय मजदूर संघ विदर्भ प्रदेशाने दि 28 डिसेंबर 2022 रोजी विधानसभा नागपुर येथे हजारो च्या संख्येने येथे भव्य मोर्चा काढुन सरकार ला जाब विचारणार असल्याची महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ( संलग्न भारतीय मजदूर संघ) निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार, हेमराज गेडे, चंद्रपुर जिल्हा भामसंघ अध्यक्ष प्रमोद येलचलवार . यांनी दिली
दि 26 डिसेंबर 2022 रोजी भारतीय मजदूर संघ कार्यालय चंद्रपुर मध्ये झालेल्या कंत्राटी कामगारांना मार्गदर्शन करताना केले आहे.
दि 12 ता पासून विदर्भ प्रदेश मध्ये संकल्प यात्रा ची सुरुवात श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा जन्म गावी पासून सुरवात झाली आहे. सदरील कार्यक्रमात महानिर्मीती, महापारेपण, महावितरण, मधील मोठ्या संख्येने विविध ऊद्योगातील कामगार उपस्थित होते.
भामसंघाने विदर्भ प्रदेशाने 28 डिसेंबर 2022 मंत्रालय नागपूर येथे कामगारांच्या विविध मागण्यांसाठी न्याय हक्कांच्या करिता कामगारांच्या भव्य मोर्चा काढणार असुन या मोर्चा मध्ये महाराष्ट्रातील संघटीत व असंघीटत क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित विविध विषयां बाबतीत , कामगारांच्या विविध मागण्या सरकार कडे मांडणार आहे.
भारतीय मजदूर संघाच्या महत्वपूर्ण मागण्या-
असंघीटत कामगारां करिता सामाजिक सुरक्षा कोड त्वरित लागु करून सुरक्षा मंडळा मार्फत लाभ देण्यात यावा.
कंत्राटी कामगार पध्दत बंद करून तेथे कार्यरत रिक्त जागांवर कार्यरत असलेल्या कंत्राटी कामगारांची कायम स्वरूपी नियुक्ती करावी, तसेच राजस्थान, आडिसा, हरियाणा, पंजाब राज्याप्रमाणे कंत्राटी कामगारांना कायम नोकरीत समाविष्ट करावे.घरेलु कामगार कल्याण मंडळाचे काम व बांधकाम कल्याण मंडळामार्फत सुविधा, लाभ देण्यात यावेत.
अंगणवाडी सेविका व आशा वर्कर्स यांच्या मानधनात वाढ करून त्यांना सरकारी कर्मचारी घोषित करावे.
बिडी ऊद्योगातील कामगारांना किमान वेतना ची प्रभावीपणे अंमलबजावणी त्वरित करण्यात यावी.
ई पी फ पेंशन दरमहा रू 5000 करण्यात यावी व महागाई भत्ता देण्यात यावा.
राज्य सरकारी कर्मचारी करिता जुनी पेंशन योजना लागु करण्यात यावी.
पेट्रोल, डिझेल व गॅस यांना जी ऐस टी च्या कक्षेत आणुन महागाई वर नियंत्रण आणावे.
संरक्षण उद्योगांचे निगमीकरण मागे घेण्यात यावे.
बॅंक व ऐल आय सी चे खाजगी करण मागे घेण्यात यावे.
महाराष्ट्रातील अनुसूचित ऊद्योगातील प्रलंबित किमान वेतन वाढ त्वरित घोषित करण्यात यावी.
भंडारा, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील कंत्राटी कामगारांना शासकीय नियमा प्रमाणे 15% नक्षलग्रस्त भत्ता देण्यात यावा.
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळातील सर्व कामगारांचे वेतन नियमीतपणे करण्यात यावे.
राज्यातील अभयारण्य मध्ये कार्यरत गाईडस कर्मचारांना शासन सेवेत नियमीत करावे.
या वेळी व्यासपीठावर भारतीय मजदूर संघाचे चंद्रपुर जिल्हा अध्यक्ष प्रमोद येलचलवार , महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष निलेश खरात, सरचिटणीस सचिन मेंगाळे, कोषाध्यक्ष सागर पवार हेमराज गेडे, विकास आडबले, संघटन मंत्री , संतोष निकुरे, संगपाल धाटे ,किशोर महाडोळे, ज्ञानेश्वर गुरले, जगन साधरे, सचिन जांबुळे, अंकुश डोंगरवार, दिलीप भगत, उमाकांत उरकडे, दहीसागर वाकडे, दिपक उमरगुंडावार, अविनाश बावणे, निलेश कस्तुरे, या पदाधिकारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. सदर कार्यक्रमास विविध ऊद्योगातील पदाधिकारी प्रमुख उपस्थित होत कार्यक्रम चे सुत्रसंचालन हेमराज गेडे यांनी व आभार प्रदर्शन विकास आडबले यांनी केले आहे .
दि 28 डिसेंबर रोजी नागपूर येथील मोर्चा मध्ये मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचा निर्धार करण्यात आला