कोल्हेवाडी येथील सुरेखा भास्करराव दिघे यांचे निधन

संगमनेर प्रतिनिधी
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सुरेखा भास्करराव दिघे (वय ६७) यांचे आज शुक्रवारी निधन झाले. त्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होत्या.
धार्मिक व मनमिळाऊ स्वभावाच्या असल्याने त्या सर्वदूर परिचित होत्या. जनसेवा मंडळाचे तालुकाध्यक्ष स्वर्गीय भास्करराव दिघे यांच्या त्या पत्नी तर प्रवरा पतसंस्था व भगतसिंग दूध संस्थेचे अध्यक्ष राहुल (नंदू) दिघे व प्रगतशील शेतकरी गिरीष दिघे यांच्या त्या आई होत. त्यांच्या पश्चात दोन मुल, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शोकाकुल वातावरणात कोल्हेवाडी अमरधाम येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष दुर्गा तांबे, थोरात कारखान्याचे अध्यक्ष प्रतापराव ओहोळ, पतितपावन संघटनेचे प्रा. एस. झेड. देशमुख, सरपंच दत्तात्रय खुळे, डॉ. अशोक इथापे, माजी सभापती पांडुरंग घुले, मछिंद्र थेटे, अॅड. बापूसाहेब गुळवे, जेष्ठ नेते अशोकराव दिघे, शिवसेना तालुका प्रमुख जनार्दन आहेर, चंद्रकांत घुले, सतिष वाळुंज, प्रमोद राहाणे, प्रशांत कांबळे, नितीन दिघे, गवराम खुळे, बजरंग वामन, पोपट कोल्हे, अर्जुन काशीद यांचे सह मोठा जनसमुदाय उपस्थित होता.