रिपब्लिकन पक्षाच्या राज्य उपाध्यक्ष पदी विजयराव वाकचौरे यांची निवड

अकोले प्रतिनिधी
रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी जेष्ठ नेते विजयराव वाकचौरे यांची निवड झाली .
त्याच अनुशंगाने अकोले तालुका कार्यकारणीची बैठक रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित केली होती ,
बैठकीला सुरुवात करण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी ढोल ताशांच्या गजरात विजयराव वाकचौरे यांची सन्मानपूर्वक स्वागत रॅली महात्मा फुले चौक ते शाहूनगर अशी काढली . चौकाचौकात विजयराव वाकचौरे यांचे कार्यकर्त्यांनी शाल , पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. अकोलेच्या चौकात स्वतः आमदार किरण लहमटे हे स्वागत करण्यासाठी जाणीवपूर्वक हजर राहिले . कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली . लोणावळा येथील राज्य कार्यकारणीच्या बैठकीत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी वाकचौरे यांच्या नावाची घोषणा केली आहे .त्याचा आनंद म्हणून आज कार्यकर्त्यांनी भव्य स्वागत केले . निवडीनंतर प्रथमच विजयराव वाकचौरे हे आज अकोलेत दाखल झाले . आज बैठकीत सभासद मोहिमेचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचे हस्ते करण्यात आला . या वेळी विभागीय जिल्हाध्यक्ष भिमराज बागुल, युवक जिल्हाध्यक्ष पप्पू बनसोडे, संगमनेर तालुकाध्यक्ष आशिष शेळके, चंद्रकांत सरोदे ,शांताराम संगारे, राजेंद्र घायवट, जयराम आढाव, महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष अश्विनी कसबे, ख्रिश्चन समाज महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वृषाली पवार, ख्रिश्चन समाज आघाडीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वैराट, शहराध्यक्ष विशाल वैराट, युवक तालुकाध्यक्ष शंकर संगारे, कार्याध्यक्ष सावळेराम गायकवाड , संदीप शिंदे आदि उपस्थित होते

. यावेळी गाव तिथे शाखा निर्माण करून तालुक्यातुन दहा हजार सभासद करून चाळीस हजार रिपब्लिकन पक्षाचे स्वतंत्र मतदार निर्माण करून येणाऱ्या काळात असल्याचे विजयराव वाकचौरे यांनी सत्काराला उत्तर देताना सांगितले . तर अध्यक्षीय मनोगतात जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले की जिल्ह्यात वेगवेगळ्या आघाड्या स्थापन केल्या आहेत . पक्ष राजकीय पटलावर काम करेल मात्र अन्याय अत्याचार प्रसंगी समाजाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरून काम करेल . ना आठवले यांची ताकद नगर जिल्ह्यात अधिक मजबूत करू . त्या साठी प्रत्येक तालुक्यात बैठका घेऊ
विजयराव वाकचौरे हे आम्हाला पितृतुल्य आहेत .त्यांचेच माध्यमातून आम्ही चळवळ शिकलो आहोत ते राज्याला नक्कीच दिशा देतील . त्यांना राजकीय सत्ता मिळवून देण्यासाठी नगर जिल्ह्याच्या वतीने ठराव करू असे जिल्हाध्यक्ष थोरात यांनी सांगितले.
उपस्थित कार्यकर्त्यांचे स्वागत कळस गावचे सरपंच तथा रिपब्लिकन पक्षाचे तालुकाध्यक्ष राजेंद्र गवांदे यांनी केले . तर आभार युवक अध्यक्ष शंकर संगारे यांनी केले .