इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. १७/०९/२०२२

🙏 सुप्रभात 🙏


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २६ शके १९४४
दिनांक :- १७/०९/२०२२,
वार :- मंदवासरे(शनिवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:१८,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२९,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- सप्तमी समाप्ति १४:१५,
नक्षत्र :- रोहिणी समाप्ति १२:२१,
योग :- सिद्धि अहोरात्र,
करण :- बालव समाप्ति २७:२२,
चंद्र राशि :- वृषभ,
रविराशि – नक्षत्र :- सिंह(०७:२१नं. कन्या) – उत्तरा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- सिंह,
राशिप्रवेश :- रवि – कन्या ०७:२१,
शुभाशुभ दिवस:- चांगला दिवस,

✿राहूकाळ:- सकाळी ०९:२१ ते १०:५२ पर्यंत,

लाभदायक वेळा
शुभ मुहूर्त — सकाळी ०७:५० ते ०९:२१ पर्यंत,
लाभ मुहूर्त — दुपारी ०१:५५ ते ०३:२६ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०३:२६ ते ०४:५८ पर्यंत,

❀ दिन विशेष:-
कालाष्टमी, रवि कन्या ७:२१, मु. ४५ समर्घ, पुण्यकाल ०७:२१ ते १३:४५, अमृत १२:२१ प.,
————–

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- भाद्रपद २६ शके १९४४
दिनांक = १७/०९/२०२२
वार = मंदवासरे(शनिवार)

मेष
तिखट आणि मसालेदार पदार्थांचे सेवन टाळा. दुसर्‍यावर हुकूमत गाजवू नका. आध्यात्मिक आवड वाढीस लागेल. कुटुंबा समवेत वेळ उत्तमपणे घालवाल. जुन्या मित्राची अचानक गाठ पडेल.

वृषभ
कामाच्या ठिकाणी मानाचा दर्जा मिळेल. सामाजिक गोष्टींची जाणीव ठेवून वागावे. जुनी कामे प्राधान्याने पूर्ण करा. व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींचा दिनक्रम व्यस्त राहील. भागीदारीच्या बाबतीत सारासार विचार करा.

मिथुन
हट्टीपणे वागू नका. बुद्धिमत्तेचे दर्शन घडवा. अनेक कामे हातावेगळी कराल. मात्र घाईने समस्या ओढवून घेऊ नका. कामाचा प्राधान्यक्रम लक्षात घ्या.

कर्क
भागीदारीत फायदा होईल. खेळ आणि आरामात बराच काळ घालवाल. अनेक कामे अंगावर पडू शकतात. जबाबदार्‍यांचा ताळमेळ सांभाळावा. शक्यतो वादविवादात पडू नका.

सिंह
दुसर्‍यास समजून सांगण्याची हातोटी निर्माण कराल. निराशेचे बळी होऊ नका. वाहनाची समस्या उद्भवू शकते. प्रतिकूलतेत संयम बाळगावा. कुटुंबात मान सन्मान प्राप्त होतील.

कन्या
भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. परिस्थितीचा आढावा घेऊन काम करा. कौटुंबिक जबाबदार्‍यांकडे दुर्लक्ष करू नका. अति कामाचा थकवा जाणवेल. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ
इतरांशी व्यवहाराने वागाल. समस्यांचे निराकरण सक्षमतेने कराल. निराश न होता परिस्थिती हाताळा. कामावर लक्ष केन्द्रित करावे. प्रिय व्यक्तीचा रूसवा दूर करावा लागेल.

वृश्चिक
अतिसाहस करू नका. कामानिमित्त प्रवास करावा लागेल. दुसर्‍याची मानसिकता समजून घ्या. जबाबदारी पार पडताना थकून चालणार नाही. खर्चात वाढ होण्याची शक्यता.

धनू
तुमच्या प्रेमळ स्वभावाचा गैर फायदा घेऊ देऊ नका. तुमच्या शक्तीची लोकांना कल्पना येईल. घरातील अतिरिक्त कामे अंगावर पडतील. नियोजनाने वाटचाल करावी. रागावर नियंत्रण ठेवा.

मकर
शांतता व संयम बाळगा. आत्मविश्वास वाढीस लागेल असे काम करा. दिवस मनाजोगा घालवाल. काही कामे नाईलाजाने करावी लागतील. स्वयंपाक करताना खबरदारी घ्यावी.

कुंभ
गूढ गोष्टींबद्दल आवड वाटेल. नवीन लोकांशी मैत्री कराल. सकारात्मक विचार करावेत. मनाच्या चंचलतेला आवर घालावी. प्रवासात सावधानता बाळगा.

मीन
दिवस उत्साहात व आनंदात जाईल. अचानक धनलाभाचे योग. जोडीदाराची प्रगति होईल.  परदेशात जाण्याची संधी चालून येईल. चांगल्या कामासाठी पैसे खर्च कराल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button