कराड नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी अनिरुद्ध लाड यांना श्रद्धांजली

रायगड प्रतिनिधी
कराड नगरपरिषदेचे सफाई कर्मचारी अनिरुद्ध लाड हे शहरातील वाखाण परिसर येथील अंडरग्राऊंड ड्रेनेज लाईनची साफसफाई करत असताना ऑक्सिजनच्या कमतरते मुळे बेशुद्ध पडले आणि हाॅस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आल्या नंतर उपचारा दरम्यान त्यांना मृत झाले
अनिरुद्ध यांना मदत करण्यासाठी गेलेले अमोल चंदनशिवे यांना गंभिर दुखापत झाली आहे त्यांचेवर सध्या उपचार चालू आहेत स्वतःचा जीव धोक्यात घालून व स्वतःच्या आरोग्याची काळजी न करता जनतेचे आरोग्य चांगले राहिले पाहिजे या भूमिकेतून सर्व सफाई कर्मचारी काम करत असतात
जनतेला आरोग्यदायी उत्तम सेवा देते वेळी झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे. त्यांच्या कुटुंबाला मानसिक व आर्थिक आधार देण्याची गरज असून त्यामुळे कराड नगरपरिषद आणि महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनिरुद्ध लाड यांच्या कुटूंबियांना सन्मानपूर्वक योग्य ती नुकसान भरपाई मिळणे आवश्यक असल्याची भावना यावेळी अनेकांनी व्यक्त केली
सर्व कामगार संघटनेच्या अध्यक्ष व पदाधिकारी यांनी नगरपालिके समोर सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी डॉ. डि एल कराड ॲड सुरेश ठाकूर श्री डि पी शिंदे श्री रामगोपाल मिश्रा संतोष पवार अँड.सुनील वाळुजकर
(सुर्यवंशी) आदी उपस्थित होते