इतर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वाढदिवसा निमित्ताने शेवगाव मध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन


शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा वाढदिवस १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर महात्मा गांधी जयंती या कालावधीत सेवा पंधरवडा भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.
यानिमित्ताने आज माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचे वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार मोनिकाताई राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी शेवगाव मंडलात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
मौजे वडुले बुद्रुक येथे भाजपा शेवगाव मंडळाचे संघटन सरचिटणीस भीमराज सागडे यांचे नेतृत्वाने ग्रामपंचायतचे पदाधिकारी, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पदाधिकारी, भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, संबंधित शासकीय कर्मचारी यांचे उपस्थितीत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले, यावेळी ७० – ७५ नागरिकांची रक्तदाब तसेच साखरेची तपासणी केली व ३५ महिलांनी हिमोग्लोबिनची तपासणी केली, यावेळी अकरा कुष्ठरोग रुग्णांना तपासणीसाठी तालुका स्तरावर पाठवण्यात आले तसेच या सेवा पंधरवडा कार्यक्रम अंतर्गत लंपी स्किन आजाराच्या संदर्भात जनावरांची तपासणी व सुमारे १०० जनावरांचे लसीकरण करण्यात आले. यावेळी शेवगाव येथील बाळासाहेब भारदे हायस्कूल व न्यू आर्ट कॉमर्स सायन्स कॉलेज शेवगाव येथील नॅशनल कॅडेट कोर्स (एनसीसी) चे विद्यार्थी व त्यांच्या शिक्षक वृंदाच्या सहकार्याने व ग्रामस्थांच्या मदतीने गावात स्वच्छता शिबिराचे आयोजन करून ग्राम स्वच्छता करण्यात आली.
शेवगाव शहरात भाजपा वतीने भाजपा शिक्षक आघाडीचे अध्यक्ष प्राध्यापक नितीन मालानी, युवा नेते सुरज लांडे, मच्छिंद्र बर्वे, किरण काथवटे, अमोल माने यांनी सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून मौजे तळणी तालुका शेवगाव येथील गोशाळेत गो ग्रास पेंड, हिरवा चारा व रोख स्वरूपात देणगी दिली. तसेच शेवगाव शहरातील विश्व हिंदू परिषदेचे श्री संत धुंडा महाराज वस्तीगृह येथील विद्यार्थ्यांना फळे व खाऊचे वाटप केले. त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी बोधेगाव परिसर यांनी सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून श्री एकनाथ उर्फ बाबा सावळकर, भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांतआबा गरड अनिल परदेशी, विक्रम बारवकर, मिठूबप्पा काजळे, आधोडी गावचे सरपंच सुगंध खंडागळे, ज्येष्ठ नेते विश्वनाथ भाऊ घोरतळे, गणपत खेडकर, जमील मनेर, अशोक बाणाइत, विठ्ठल भोंगळे, विठ्ठल दराडे, किरण दराडे, पुंजाराम ढवण, सचिन शेळके, सचिन जांभुळकर, संतोष ढवळे, आदींच्या उपस्थितीत मौजे बोधेगाव येथील दराडे वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले, तसेच शाळा परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच तालुक्यात लंपी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सेवा पंधरवडा अंतर्गत बोधेगाव परिसरातील जनावरांची तपासणी व लसीकरण करण्यात आले.
महिला आघाडी अध्यक्षा आशाताई गरड यांनी पंतप्रधान यांचे वाढदिवसानिमित्त मौजे अमरापुर येथे महिला आरोग्य शिबिराचे आयोजन केले, या कार्यक्रमासाठी हेल्थ फिटनेस सल्लागार वैशाली दराडे यांनी महिलांकडून प्रात्यक्षिक करून घेतले तसेच डॉक्टर अनंत सातपुते, डॉ सातपुते मॅडम यांनी मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. गणेश गरड, संदीप बोरुडे, संगीता बोरुडे व महिला सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button