पारनेर येथे जागतिक चालक दिन साजरा; बस चालकांचा सन्मान

चालक कुटुंबाप्रमाणेच प्रवाशांची काळजी घेतात : प्रियंका खिलारी
पारनेर/प्रतिनिधी
:दळणवळण व परिवहन क्षेत्रात वाहन चालकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे १७ सप्टेंबरला जागतिक चालक दिनी पारनेर तालुका शिवसेना महिला आघाडी प्रमुख प्रियांका अतुल खिलारी यांनी एस.टी. महामंडळाच्या चालकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन चालकांचा सन्मान केला.
शिवसेना महिला आघाडी तालुका प्रमुख प्रियांका खिलारी म्हणाल्या की, जगातील पहिला चालक म्हणजे श्रीकृष्ण ज्यांनी अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केलं. त्याच प्रमाणे वाहन चालक आपल्या कुटुंबाप्रमाणेच प्रवाशांच्या जीवाची काळजी घेतात. वाहनाची पुढची काच खूप मोठी असते आणि मागे कोण आहे हे बघण्याचा आरसा मात्र अगदी छोटासा असतो.कारण भूतकाळाला फारच थोडे महत्त्व आहे. मागे फक्त लक्ष ठेवा. भविष्यकाळ महत्त्वाचा आहे, भूतकातीळ गोष्टींचा विसर पडून भविष्य काळात आपल्या ध्येयापर्यंत पोहचवणे हेच प्रमुख ध्येय चालकाचे असते.चालकांची स्तुती करताना ज्याच्या हातात स्टेरिंग त्याच्यातच खरी डेरिंग असे म्हणत काही क्षणातच निर्णय घेण्याची ताकद फक्त चालकात असते.असे म्हणत पारनेर तालुक्यातील चालकांना प्रोत्साहन दिले.सदर
कार्यक्रमाप्रसंगी पारनेर आगार प्रमुख पराग भोपळे, इंद्रनील कुसकर, कर्मचारी व चालक, उपस्थित होते. पोखरी महिला आघाडी प्रमुख जयश्री शिंदे, ढोकी महिला आघडी शाखा प्रमुख रिजवान पठाण, अर्चनाताई दिवेकर, प्रियांका शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख अमोल ठुबे, शिवसेना सचिव राजाभाऊ मोरे, महेश शिंगोटे, युवासेना अध्यक्ष आदिनाथ कदम, शुभम पाडळे, राजू बोरुडे शिवसेना युवासेना महिला आघाडी आदी ग्रामस्थ उपस्थित होते.