झाडे लावून ती जगवण्याची चळवळ उभी केली पाहिजे ब्राम्हणवाडा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम धांडे

अकोले, प्रतिनिधी
: झाडांचे महत्व ओळखून झाडे लावा झाडे जगवा. यासाठी आपल्या पालकांची मदत घ्या. दिवसेंदिवस उष्णतेची तिव्रता वाढत आहे. ती कमी करण्यासाठी झाडे लावून ती जगवण्याची चळवळ उभी केली पाहिजे असे प्रतिपादन ब्राम्हणवाडा बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी सीताराम धांडे यांनी केले.
श्री. धांडे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आबिटखिंड येथे शाळा भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
यावेळी जांभळेवाडी केंद्राचे केंद्रप्रमुख जनार्दन भवरे हेही उपस्थित होते. मुख्याध्यापक राजेंद्र उकिरडे यांनी त्यांचे स्वागत केले, यावेळी भोजनेवाडी शाळेचे मुख्याध्यापक बाळू वायळ हेही उपस्थित होते.
शाळेत नियमीत उपस्थित राहून चांगला अभ्यास करुन मोठे व्हा असे आवाहनही श्री. धांडे यांनी यावेळी केले. शाळेतील विद्यार्थी गुणवत्ता, विद्यार्थ्यांचे अक्षर, तालासुरात म्हणत असलेल्या कविता पाहून श्री धांडे व श्री भवरे यांनी विद्यार्थी यांचे कौतूक केले. आभार सोमनाथ मुठे यांनी मानले