अहमदनगर
जिल्हा पोलीस अधीक्षक यांचे हस्ते राजूर पोलिसांचा सन्मान

विलास तुपे/राजूर प्रतिनिधी
राजूर पोलीस स्टेशन हद्दीत मागील २ महिन्यात शेतकऱ्याच्या विद्युत मोटार चोरीचे, बोकड चोरी तसेच मोबाईल चोरी केल्याचे प्रकार घडले होते. त्यानुसार राजूर पोलीस स्टेशन येथे विविध कलमान्वये ०४ गुन्हे दाखल करण्यात आले होते.
सदरच्या गुन्ह्याचा उत्कृष्ट तपास करून अल्प काळात सदरचे गुन्हे उघडकीस आणून त्यामध्ये आरोपी निष्पन्न करून त्यांचेकडून चोरीस गेलेला मुद्देमाल तसेच चोरी करण्याकरिता लागणारे साहित्य व वाहने असा एकूण १,६३,००० रू. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदर उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे मा.मनोज पाटील, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी राजूर पोलीस स्टेशन चे सहा. पोलीस निरीक्षक, नरेंद्र साबळे पोलीस अंमलदार कैलास नेहे, विजय मुंढे, दिलीप डगळे, रोहिणी वाडेकर, सुवर्णा शिंदे, अशोक गाढे, अशोक काळे, आकाश पवार, संभाजी सांगळे, विजय फटांगरे, पांडुरंग पटेकर, संगीता चोखंडे, सविता वायकर यांचा प्रशस्तीपत्र देवून गौरव केला. त्यावेळी मा.सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा.राहुल मदने, उपविभागीय पोलीस अधिकारी, संगमनेर तसेच अहमदनगर जिल्हा पोलीस दलातील इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.