इतर
पारनेर नगरपंचायत मध्ये नगरसेवकच बनले ठेकेदार!

पारनेर प्रतिनिधी:-
पारनेर नगरपंचायत मध्ये स्वतः नगरसेवकच ठेकेदार बनले आहे या ठेकेदारीत नगरसेवक नगरसेवकांना चांगला इंरेस्ट वाढला आहे ठेकेदारीतून पैसा वसूल करण्याच्या या नादात जनतेकडे दुर्लक्ष होत आहे, याला कारणीभूत स्वतः प्रशासन असून यांना लवकरच याचा प्रत्यय येईल. असे दिसून येते पारनेर नगरपंचायतचा बाजार पावतीचा ठेका स्थानिक नगरसेवकांनी घेतलेला असून त्याचा ठेकेदार वेगळाच आहे त्या सर्व प्रकरणाची चौकशी होऊन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात यावी अशी ग्रामस्थांची मागणी आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या या ठेकेदारावर योग्य ती कारवाई करून पुन्हा निविदा काढाव्यात अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.