अकोले तालुक्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करा -जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

अकोले प्रतिनिधी
अकोले तालुक्यात सतत च्या अतिवृष्टीने भाजीपाला व फळ पिकांची मोठे नुकसान झाले या पावसाने टोमॅटो पिकाचे सर्वाधिक नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला
प्रवरा,आढळा व मुळा भागात सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे शेतातील उभी पिके पावसात सडल्याने यावर्षीचा हंगाम वाया गेला आहे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच अकोले तालुक्यात भेट दिली या वेळी त्यांनी पंचनामे चे आदेश दिले अकोले तालुक्यातील अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची तातडीने पंचनामे करावेत असे आदेश दिले यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई सुरू केली असून तालुक्यातील अतिवृष्टी ग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत
स्थानिक शेतकऱ्यांना दवंडी द्वारे यांची माहिती द्यावी व येत्या दहा-बारा दिवसात हे सर्व पंचनामे पूर्ण करावे असे आदेश अकोल्याचे तहसीलदार सतीश थेटे यांनी दिले आहे तालुक्यात सर्व गावात दवंडी देऊन पंचनामे चालू असल्याची व्यापक प्रसिद्धी तलाठी कोतवाल यांनी करावी असे आदेश त्यांनी यंत्रणेला दिले आहेत—–