गायकर साहेब च अगस्ती सक्षमपने चालू शकतात- मारुती मेंगाळ

अगस्तीला कर्ज काढायचे
त्यावेळी विरोधक घरात बसले
अकोले प्रतिनिधी
अगस्ती सहकारी साखर कारखाना सीताराम पाटील गायकर साहेब हेच सक्षम पणाने चालवू शकतात असा मतदारांचा विश्वास असल्याचे अकोले पंचायत समितीचे माजी उपसभापती मारुती मेंगाळ यांनी म्हटले आहे
अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक प्रक्रिया शेवटच्या टप्यात येऊन ठेपली आहे .अगस्ती सहकारी साखर कारखान्याचा कारभार कोण सक्षमपणे चालू शकतो ही सांगणारी निवडणूक आहे. पहिल्या टप्प्यात निवडणूक रद्द झाल्यानंतर अगस्ती कारखाना चालू करण्यासाठी जी धडपड करणे गरजेची होती ती फक्त श्री सिताराम पा .गायकर यांनी केली आहे या गोष्टीचे सर्व अकोले तालुक्यात साक्षीदार आहे.असे मेंगाळ म्हणाले
जेव्हा कर्ज मिळवण्याची वेळ आली .तेव्हा गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली तिन्ही संचालक मंडळ एकत्र आले आणि जवळपास 87 कोटी रुपये कर्ज कारखान्यासाठी जिल्हा बँक कडून आणले .जेव्हा संचालक मंडळाच्या 7/12 उताऱ्यावर कर्ज काढण्याची वेळ आली तेव्हा गायकर साहेबांचे समर्थक पुढे आले मात्र विरोधकांनी हात वर केले.अगस्ती सहकारी साखर कारखाना चालविण्यासाठी जे जे काही करण्याची गरज निर्माण झाली तेव्हा स्वतः गायकर साहेब आणि शेतकरी समृध्दी मंडळातील नेते पुढे आले. विरोधक मात्र घरात बसून राहिले त्यामुळे अगस्ती सहकारी साखर कारखाना कोण चालू शकतो हे आता सिद्ध झाले आहे. ऊस उत्पादक सभासद हा सुज्ञ मतदार आहे. त्यामुळे 25 तारखेला होणाऱ्या मतदानाच्या वेळी अकोले तालुक्यातील ऊस उत्पादक सभासद गायकर साहेबांच्या नेतृत्वाखाली शेतकरी समृध्दी मंडळाच्या सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील यात आता तीळ मात्र शंका नाही.26 तारखेला जो निकाल लागेल त्या दिवशी गुलाल शेतकरी समृध्दी मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या खांद्यावर बघायला मिळेल .हा विश्वास श्री मेगाळ यांनी व्यक्त केला