इतर

आजचे पंचांग व राशिभविष्य दि. २५/०९/२०२२

🌏 दैनिक राशीभविष्य 🌏


राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन ०३ शके १९४४
दिनांक = २५/०९/२०२२
वार = भानुवासरे(रविवार)

मेष
दिवस मनासारखा घालवाल. आर्थिक स्थिती उत्तम राहील. इतरांचे गैरसमज दूर करावे लागतील. जुन्या मित्रमंडळींच्या भेटीचा योग. जोडीदाराची उत्तम साथ मिळेल.

वृषभ
मनाची द्विधावस्था टाळावी. एकाच गोष्टीवर ठाम राहावे. मनातील नसती शंका काढून टाकावी. वाहन चालवताना काळजी घ्यावी. दिवसभर कामाची धांदल राहील.

मिथुन
लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. चारचौघात प्रतिष्ठा कमवाल. सावधगिरी बाळगून व्यवहार करावा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. मुलांकडून शुभ वार्ता मिळेल.

कर्क
उत्तम कौटुंबिक सौख्य राहील. आवडते पदार्थ चाखाल. परिश्रमाचे चीज होईल. मुलांबद्दलचा विश्वास दृढ होईल. आवडीच्या वस्तु खरेदी कराल.

सिंह
गुंतवणूक विचारपूर्वक करावी. संमिश्र घटना जाणवतील. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. धार्मिक गोष्टींकडे कल राहील. क्षुल्लक मुद्दा वादाचा ठरू शकतो.

कन्या
तुमच्या कलेचे कौतुक केले जाईल. क्षुल्लक कारणाने नाराज होऊ नका. निर्भीडपणे कामे पूर्ण कराल. कार्यालयीन सहकारी उत्तम साथ देतील. जोडीदाराला खुश करावे.

तूळ
मानसिक आरोग्य जपावे. ग्रहमानाची साथ लाभेल. आपले विचार ठामपणे मांडाल. गोड बोलून कार्यभाग साधाल. मनातील नसत्या कल्पना काढून टाका.

वृश्चिक
उधारी वसूल करण्याच्या मागे लागा. लोक तुमचा सल्ला विचारात घेतील. फसव्या लोकांपासून सावध राहावे. मेहनतीच्या जोरावर कामे कराल. प्रयत्न अपेक्षेप्रमाणे साथ देतील.

धनू
अतिगोड पदार्थ खाणे टाळावे. तुमच्या अनुभवाचा फायदा होईल. भाग्याची उत्तम साथ मिळेल. घरात शांतता नांदेल. धार्मिक कामाकडे कल राहील.

मकर
घरासाठी खरेदी केली जाईल. चिकाटीने कामे करावीत. मौल्यवान वस्तु लाभतील. अनावश्यक खर्च संभवतात. प्रलंबित कामे मार्गी लागतील.

कुंभ
सामाजिक प्रतिष्ठा वाढीस लागेल. नातेवाईकांची खुशाली कळेल. बौद्धिक कामात लक्ष घालाल. तिखट शब्द टाळावेत. खर्च मर्यादित ठेवावा.

मीन
दिवस मनासारखा घालवाल. धडाडीने कामे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे पूर्ण होतील. उत्तम कौटुंबिक सौख्य लाभेल. तुमचे मनोबल वाढीस लागेल.

🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻


🍁🍁 आजचे पंचांग 🍁🍁

राष्ट्रीय भारतीय सौर दिनांक:- आश्विन ०३ शके १९४४
दिनांक :- २५/०९/२०२२,
वार :- भानुवासरे(रविवार),
🌞सुर्योदय:- सकाळी ०६:२०,
🌞सुर्यास्त:- सांयकाळी ०६:२२,
शक :- १९४४
संवत्सर :- शुभकृत्
अयन :- दक्षिणायन
ऋतु :- वर्षाऋतु
मास :- भाद्रपद
पक्ष :- कृष्णपक्ष
तिथी :- अमावास्या समाप्ति २७:२५,
नक्षत्र :- उत्तरा समाप्ति २९:५५,
योग :- शुभ समाप्ति ०९:०५,
करण :- चतुष्पाद समाप्ति १५:२२,
चंद्र राशि :- सिंह,(११:२२नं. कन्या),
रविराशि – नक्षत्र :- कन्या – उत्तरा,
गुरुराशि :- मीन,
शुक्रराशि :- कन्या,
राशिप्रवेश :- राशिप्रवेश नाहीत,
शुभाशुभ दिवस:- अनिष्ट दिवस,

राहूकाळ:- संध्या. ०४:५२ ते ०६:२२ पर्यंत,

लाभदायक वेळा
लाभ मुहूर्त — सकाळी ०९:२० ते १०:५० पर्यंत,
अमृत मुहूर्त — सकाळी १०:५० ते १२:२१ पर्यंत,
शुभ मुहूर्त — दुपारी ०१:५१ ते ०३:२१
पर्यंत,

दिन विशेष:-
सर्वपित्री दर्श अमावास्या(भादवी पोळा), अमावास्या श्राद्ध, अन्वाधान, अमृत २९:५५ नं.,
————–

वेदमुर्ती/ज्योतिष सल्लागार:-
श्री. प्रशांत(देवा) कुलकर्णी रा. जेऊर
ता. करमाळा जि. सोलापूर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button