इतर

अगस्ती साखर कारखाना निवडणूकीत 85.38 टक्के मतदान

अकोले | प्रतिनिधी

अगस्ती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूकीत आज रविवारी उत्साही वातावरणात मतदान पार पडले या निवडणुकीत 85.38 टक्के मतदान झाले

भाजप प्रणित माजी मंत्री मधुकरराव पिचड व माजी आमदार वैभवराव पिचड यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास मंडळ व आमदार डॉ किरण लहामटे, जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम पाटील गायकर, जिपचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मधुकरराव नवले, माकप नेते डॉ अजित नवले, कम्युनिस्ट नेते कॉ कारभारी उगले, आर पी आय चे नेते विजयराव वाकचौरे, आदींच्या महाविकास आघाडी प्रणित नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळात सरळ चुरशीची लढत झाली
तालुक्यात अकोले राजूर कोतुळ देवठाण समशेरपूर धामणगाव पाट शेंडी इंदोरी कोहणे येथील एकूण 23 मतदान केंद्रावर मतदान झाले . या निवडणुकीसाठी 8342 सभासद मतदार व 50 उत्पादक व बिगर उत्पादक पणन संस्था प्रतिनिधी असे एकुण 8392 मतदार होते
आज रविवारी सकाळी 8 वाजता 23 मतदान केंद्रांवर मतदानास सुरुवात झाली. सुरुवातीला मतदानाचा वेग फार नव्हता,पहिल्या दोन तासात 18 टक्के मतदान झाले त्यानंतर मतदानाचा वेग वाढत गेला. दुपारी 12 वाजेपर्यंत 45 इतके मतदान झाले तर दुपारी 2 वाजेपर्यंत 70 टक्के मतदान झाले.त्यानंतर उर्वरित मतदान झाले यां निवडणुकीत एकूण 8,392 मतदारां पैकी 7,165 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला सोमवारी 26सप्टेंबर 2022 ला अकोले येथे अगस्ती महाविद्यालया चे के बी सदा दादा सभागृहात मतमोजणी
प्रक्रिया पार पडणार आहे

मतमोजणी व निकला चे पार्श्वभूमीवर अकोल्यात वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अकोल्यात वाहतूक नियोजन करण्यात आले आहे या निमित्ताने अकोल्यात येणाऱ्या वाहनधारकांसाठी व नागरिकांना सूचना पोलीस प्रशासनाने दिल्या आहे

1) राजूर व इंदुरी गावंकडून येणारी चारचाकी व दुचाकी वाहने हे पिरबाबा मंदिर नवलेवाडी फाटा शेजारी लावतील .
2) कळस, समशेरपुर ,देवठाण ,परखतपूर या गावाकडून येणारी चार चाकी व दुचाकी वाहने ही बाजारतळ अकोले या ठिकाणी लावतील
3) कोतुळ धामणगाव पाठ या गावांकडून येणारी दुचाकी वाहने व चारचाकी वाहने हे पोलीस ग्राउंड मैदान पंचायत समिती कार्यालयासमोर लावतील
वरील नियोजना प्रमाणेच सर्व वाहनधारकांनी व नागरिकांनी आप- आपली वाहणे व्यवस्थित रीत्या लावुन होणाऱ्या संभाव्य वाहतूक कोंडीस टाळण्याकरिता सहकार्य करावे असें आवाहन अकोले पोलीस स्टेशन चे.सहायक पोलीस निरक्षक
मिथुन घुगे यांनी केले आहे

अगस्ती कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत शेंडी मतदान केंद्रावर बोगस मतदान झाल्याच्या आरोपा वरून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अशोकराव भांगरे ,युवा नेते अमित भांगरे आणि माजी मंत्री मधुकरराव पिचड ,माजी आमदार वैभवराव पिचड हे आमच्या आमने आल्याने बराच काळ शाब्दिक संघर्ष झाला यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले यावेळी पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांनी वातावरण शांत केले भांगरे -पिचड घराण्यातील संघर्ष या ठिकाणी पुन्हा दिसून आला माजी मंत्री मधुकर पिचड यांनी या केंद्रावर मयत व्यक्तीच्या नावे मतदान झाल्याचा आरोप करत या केंद्रावर फेर मतदान घेण्याची मागणी करत ठिया आंदोलन केले मात्र निवडणूक अधिकाऱ्यांनी तसे झाल्यास कायदेशीर गुन्हे दाखल करू अशी सांगत फेर मतदान प्रक्रियेला नकार दिला

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button