रोटरी क्लब ऑफ नासिक ने साजरा केला जागतिक मृदा दिवस

नाशिक प्रतिनिधी
जागतिक मृदा दिनानिमित्त रोटरी कृषिमंथन या प्रकल्प अंतर्गत गुरुवार 5 डिसेंबर 2024 रोजी रोटरी क्लब ऑफ नाशिक व ॲग्री सर्च इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने, दिंडोरी रोड नाशिक येथे जागतिक मृदा दिनानिमित्त चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले.
जागतिक मृदा दिनानिमित्त उद्यान विद्या तज्ञ रोटे. हेमराज राजपूत सेक्रेटरी प्रकल्प यांनी रोटरी क्लब नाशिक कृषी मंथन अंतर्गत राबवत असलेल्या विविध योजना व फळे भाजीपाला उत्पादनात माती संवर्धनाचे महत्त्व याविषयी मार्गदर्शन केले. रोटे डॉ. रामनाथ जगताप यांनी पर्यावरणातील बदल आणि जमिनीतील समस्या व त्याचे संवर्धन यावर मार्गदर्शन केले. रोटे रफिक वोरा यांनी पर्यावरण संवर्धन, मधमाशांचे संगोपन यावर मार्गदर्शन केले.

प्रमुख पाहुणे रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष रोटे.ओम प्रकाश रावत होते रोटरी क्लबचा आंतरराष्ट्रीय स्तरावर व आपल्या क्लब करून राबविता येणाऱ्या विविध कृषी पूरक व सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. आपले जीवन सुखकर करण्यासाठी धरतीचे आरोग्य जपले पाहिजे व आपल्या आरोग्य तपासणी सारखीच धरतीची आरोग्य तपासणी वेळोवेळी करत रहायला पाहिजे असा सल्ला त्यांनी दिला .
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्वलन व मृदा पूजन करण्यात आले. या प्रसंगी सर्व उपस्थितांनी जागतिक मृदा दिनाची शपथ घेतली . ॲग्री सर्च इंडिया तर्फे विविध उत्पादने व जमीन व पर्यावरण संवर्धनासाठी होणारा फायदा याविषयी कंपनीचे संचालक कृषी शास्त्रज्ञ डॉ. सतीश भोंडे यांनी माहिती दिली. डॉ. बसवेश यांनी जैविक खते व त्याचा जमीन सुधारणे ला होणारा फायदा याविषयी मार्गदर्शन केले. चर्चासत्राचे अध्यक्ष ॲग्री सर्च संचालक श्री मुळाने यांनी मार्गदर्शनपर भाषण केले.
या कार्यक्रमात

ॲग्री सर्च टेक्निकल टीम,फिल्ड स्टाफ व शेतकरी अशा 50 लोकांनी सहभाग घेतला. श्री योगेश अमृतकर यांनी सूत्रसंचालन केले डॉ. कुशारे यांनी आभार मानले.
या कार्यक्रमाचे आयोजनासाठी रोटे. पंडित खांदवे, रोटे.प्रदीप कोठावदे, संचालक ॲग्री सर्च यांचे मार्गदर्शन लाभले.