इतर

कोतुळ येथे  अतिक्रमणा वर हातोडा  बेघर कुटुंबांनी थाटला ग्रामपंचायत समोर संसार! 


बेघर 9 कुटुंबांचे ग्रामपंचायत समोर बेमुदत  उपोषण सुरू


कोतुळ  दि 30 अतिक्रमण करून वसाहती  करणाऱ्यांच्या घरावर काल कोतुळ  ग्रामपंचायत ने  हातोडा चालवला या निषेधार्थ या परिसरातील 9 ग्रामस्थांनी कोतुळ  ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले
मौजे कोतूळ, ता. अकोले, जि. अहमदनगर येथील आदर्श नगर परिसरातील स.नं. ७०० मोठया प्रमाणात अनाधिकृत बांधकामे  करून ग्रामपंचायत चा हा भूखंड गिळणकृत होत आहे  अनेक वर्षांपासून ही अतिक्रमण होत असताना कोतुळ ग्रामपंचयत ने आज मोजक्या 9 अतिक्रमण धरकांवर कारवाई करत त्यांचे अतिक्रमण जेसीबी यंत्रणा ने उध्वस्त केले अनुसूचित जाती व भटक्या जमातीतील कुटूंबे बेघर होत असल्या कारणाने आमरण उपोषण सुरुकेले असल्याचे  या उपोषणार्थींनी सांगितले
ते पुढे म्हणाले की गेल्या काही वर्षांपासून वास्तव्य करत आहोत. गेल्या ५०-६० वर्षांपासून आम्ही कोतूळमध्ये राहतो. आमचे येथे मतदान कार्ड,रेशन कार्ड गेल्या २५ ते ३० वर्षांपासुन आहेत. त्याबद्दलचे पुरावे  जोडले आहेत. आमची कोठेही कोणत्याहीप्रकारची जमिन नाही. गावामध्ये ५०-६० वर्षांपासून छोटे व्यवसाय करून कुटूंबाचा उदरनिर्वाह करत आहोत. अनेक वेळा ग्रामपंचायतीमध्ये घरकुलासाठी अर्ज करूनही त्याची दखल घेतली नाही. कोतूळमध्ये गेल्या १५-२० वर्षांपासून व त्यापुर्वी मोठया प्रमाणात अनाधिकृत बांधकामे झालेली आहे. मग त्यामध्ये बनोटे वस्ती, लोहकरे वस्ती, कोतुळेश्वर मंदिर परिसर असेल, तसेच

आदर्शनगरमध्येदेखील ज्यांना गावामध्ये ७-८ एकरजमिन आहे, अशा लोकांनी अनाधिकृत बांधकामे केली आहेत. त्यांना वीज व नळ कनेक्शन ग्रामपंचायतीच्या परगावनीने दिले आहेत. खरे लाभार्थी घरकुलापासून वंचितच राहिले, त्यांची नावे घरकुलाच्या “ड” यादीतआली नाहीत.  आम्ही येथे आता बेघर झालो आहात आमची पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी करत रामदास फकिरा साळुंके गौतम भीमा साळवे ,सिकंदर रमजान शेख, सविता किसन पारधी ,अनिस कंकर इनामदार,बालम गणी इनामदार ,शाहरुख  फारुख शेख, राहुल भाऊराव खरात, विजय बापू खरात यांनी  मुलाबाळांच्या सह ग्रामपंचयत कार्यालया समोर आमरण उपोषण सुरू केले आहे  दिवसभरात या उपोषणार्थींची भेट घेण्यासाठी आज पहिल्या दिवशी कोणीही फिरकले नाही

——-

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button