दसरा मेळाव्यासाठी मुंबईला पायी निघालेल्या शिवसैनिकांचे काळेवाडीत स्वागत

बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक धडा शिकवणार : देवराम मगर
पारनेर/प्रतिनिधी :
राज्यात एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसमवेत शिवसेनेसोबत फारकत घेतल्याने राजकीय उलथापालत झाली. शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटाने भाजप सोबत युती करत उद्धव ठाकरे व शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य सच्चा बाळासाहेबांचा सैनिक हा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत आहे हे दाखविण्यासाठी अहमदनगर येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी दसरा मेळाव्यानिमित्त अहमदनगर ते मुंबई अशी पदयात्रा काढली आहे या पदयात्रेमध्ये शिवसेनेचे अहमदनगर जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी व असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. मुंबईच्या दिशेने निघालेल्या या पदयात्रेचे पारनेर तालुक्यातील सावरगाव काळेवाडी येथे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून संपूर्ण पारनेर तालुक्यात ओळखले जाणारे सावरगाव सेवा सोसायटीचे संचालक देवराम मगर यांनी स्थानिक शिवसैनिकांच्या उपस्थितीत नगरहून निघालेल्या पदयात्रेचे जोरदार स्वागत केले.
यावेळी बोलताना शिवसेना नेते देवराम मगर म्हणाले की बाळासाहेब ठाकरे यांच्या कट्टर विचाराचे आम्ही सैनिक असून बाळासाहेबांची शिवसेना कधीही कोणापुढे झुकणार नाही. शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांचे कार्य आम्ही सर्वजण पुढे सुरू ठेवणार आहे. उद्धव साहेब ठाकरे यांच्या पाठीमागे आम्ही कडवे कट्टर शिवसैनिक उभे असून शिवसेनेला ताकद देऊन पुन्हा उभारी देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. स्वार्थासाठी शिवसेनेला सोडून गेलेल्यांना आम्ही धडा शिकवल्याशिवाय आता शांत बसणार नाही. कडवट शिवसैनिक आजही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेसोबत आहे. पारनेर तालुक्यातील शिवसेना संघटना ही बलाढ्य संघटना आहे. मा आमदार विजयराव औटी साहेब, जिल्हा परिषद बांधकाम समितीचे माजी सभापती काशिनाथ दाते सर यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करत असून बाळासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी प्रयत्नशील आहे. शिवसेना संघटना मजबूत करण्यासाठी स्थानिक पातळीवर जोरदार प्रयत्न सुरू असून शिवसेनेच्या माध्यमातून माजी आमदार विजयराव औटी, माजी सभापती काशिनाथ दाते सर यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा पारनेर तालुक्यात भगवा फडकविल्याशिवाय आता शांत बसणार नाही असे मगर म्हणाले यावेळी दसरा मेळाव्यासाठी निघालेल्या पदाधिकाऱ्याचे स्वागत त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी शिवसैनिकांनी काढलेल्या या पदयात्रेमध्ये शिवसेना नगर दक्षिण प्रमुख शशिकांत गाडे सर, शिवसेना उत्तर नगरप्रमुख रावसाहेब खेवरे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख संदेश कार्ले, नगर तालुका शिवसेनाप्रमुख राजेंद्र भगत, शिवसेना नेते नगर पंचायत समिती मा. सभापती प्रवीण कोकाटे, शिवसेना नेते हरिभाऊ शेळके, शिवसेना श्रीगोंदा तालुकाप्रमुख बाळासाहेब दुतारे, मा. सभापती रामदास भोर, शिवसेना पाथर्डी तालुकाप्रमुख उद्धव दुसुंगे, नगर तालुका शिवसेना उपप्रमुख प्रकाश कुलट, नगरसेवक योगीराज गाडे, युवा नेते हर्षवर्धन कोतकर, शिवसेना नेते जिवाजी लगड, हे उपस्थित होते.या सर्व शिवसेना पदाधिकाऱ्यांचा सावरगाव काळेवाडी या ठिकाणी स्वागत करत शिवसेना नेते देवराम मगर यांनी सत्कार व सन्मान केला.
यावेळी देवराम मगर यांच्या समवेतग्रामपंचायत सदस्य बाळासाहेब चिकणे, मा. सरपंच बबन चिकणे, जाणता राजा प्रतिष्ठान काळेवाडी अध्यक्ष सुनिल तांबोळी, शाखाप्रमुख संदीप चिकणे, युवा नेते सुरज मगर, संतोष बेलकर, बबन गायखे, अर्जुन गोडसे, पिनु चिकणे तसेच इतर शिवसैनिक उपस्थित