भायगाव सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी कल्याण आढाव तर उपाध्यक्ष विठ्ठल लांडे यांची निवड

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
शेवगाव तालुक्यातील भायगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सेवा संस्थेची निवडणुक काही दिवसापुर्वी बिनविरोध पार पडली. १३ जागेसाठी झालेल्या या निवडी मध्ये सत्ताधारी गटाला ११ जागा तर विरोधी गटाला २ जागा देण्यात आल्या. नुतन अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीसाठी घेतलेला सभेमध्ये पुढील निर्णय घेण्यात आला. अध्यक्षपदासाठी कल्याण केशव आढाव यांच्या निवडीची सुचना पांडुरंग मुरलीधर आढाव यांनी मांडली त्यास अशोक कचरू आढाव अनुमोदन दिले. तर उपाध्यक्षपदासाठी विठ्ठल कुंडलिक लांडे यांच्या निवडीची सुचना रमेश एकनाथ आढाव यांनी मांडली त्यास सौ. आशादेवी लक्षणराव लांडे यांनी अनुमोदन दिले. अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक एक अर्ज आल्याने दोन्ही निवडी बिनविरोध जाहिर करण्यात आल्या.
यावेळी नुतन संचालक कल्याण आढाव, विठ्ठल लांडे, अशोक आढाव, रमेश आढाव, पांडुरंग आढाव, लक्ष्मण शेकडे, संदिप दुकळे, रामेश्वर दुकळे, संजय कानडे, अंबादास सांगळे, सौ. आशादेवी लांडे, सौ.सुनिता लांडे उपस्थित होते. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणून एस. एस. थोरात व साहाय्यक निवडणुक अधिकारी म्हणुन भायगाव सेवा संस्थेचे सचिव काकासाहेब विखे यांनी काम पाहिले.या निवडीचे लोकनेते मारूतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माजी आमदार नरेंद्र घुले पाटील, माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा राजश्रीताई घुले पाटील व शेवागाव पंचायत समितीचे सभापती डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी अभिंनदन केले.