काकडे विद्यालयात सायन्स बी.सी.ए ला मान्यता – दुकळे

शहाराम आगळे
शेवगाव तालुका प्रतिनिधी
आबासाहेब काकडे शैक्षणिक समुहाच्या दि. फ्रेंडस आँफ द डिस्प्रेस्ड लीग शेवगाव या संस्थेच्या शेवगाव येथील निर्मलाताई काकडे कला, विज्ञान व वाणिज्य महाविदयालयास सावित्रीबाई फुले पुणे विदयापीठाने एम.एस्सी इन काँम्प्युटर अँप्लीकेशन व बी.सी.ए सायन्स या अभ्यासक्रमास नुकतीच मान्यता दिली असून प्रवेश प्रक्रियेला सुरवात झाल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.दुकळे यांनी दिली.
कर्मयोगी आबासाहेब काकडे शिक्षण समुहाचे अध्यक्ष अँड.डॉ. शिवाजीराव काकडे व माजी जिल्हा परीषद सदस्या सौ.हर्षदाताई काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांना उपयुक्त असे शैक्षणिक अभ्यासक्रम व कोर्सेस शेवगाव सारख्या ग्रामीण भागात सुरु केले आहेत. त्यामुळे भविष्याची पावले अचुक ओळखून या दुष्काळी तालुक्यातील विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रात करिअर करण्याच्या संधी प्राप्त करुन दिल्या आहेत. विद्यार्थ्यांना परिपूर्ण व कौशल्याधिष्ठीत शिक्षण देवून संगणक अभियंता तयार करण्यासाठी प्रत्येक रविवारी संडे काँलेज ही संकल्पना राबवली जात असून त्यासाठी संगणक क्षेत्रातील नामांकीत कंपन्यांचे अनुभवी व तज्ञ व्यक्तीकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते. महाविदयालयाने सुरु केलेल्या या दोन्ही अभ्यासक्रमासाठी पात्रतेनुसार प्रवेश प्रक्रिया सुरु असून विदयार्थ्यांनी महाविदयालयाशी संपर्क साधावा असे आवाहन संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रा. लक्ष्मणराव बिटाळ, प्राचार्य डॉ. प्रशांत दुकळे यांनी केले आहे.