भाजप ने मोडकळीस आणलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था आघाडी सरकारने पुनर्जीवित केल्या — मारुती मेंगाळ

शेरणखेल येथे पंचायत समिती सेस फंडातून बंदिस्त गटार चे काम मार्गी…
अकोले प्रतिनिधी
सन – 2014 सांली महाराष्ट्रात भाजप चे सरकार आल्यानंतर महाराष्ट्रातील तत्कालीन सरकारने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे अधिकार काढून घेतल्याने पंचायत राज मधील स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्था मोडकळीस आल्या होत्या 2017 सांली राज्यात जिल्हा परिषद पंचायत समिती या सार्वत्रिक निवडणुका झाल्या तत्कालीन भाजप सरकारने जिल्हा परिषद पंचायत समितीच्या 14वित्त आयोग हा थेट ग्रामपंचायत ला वर्ग केल्याने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ला कोणत्याही प्रकारचे विकास कामे करायला अधिकार नसल्याने या स्थानिक स्वराज्य संस्था मोडकळीस आल्या होत्या तब्बल 4वर्ष पंचायत समिती सभापती/उपसभापती सन्मानित सदस्यांना विकास कामे करायला कोणत्याही प्रकारचे सेस फंड नसल्याने गणातील नागरिकांचा मोठा रोष होता मात्र महा विकास आघाडी सरकारने 15 वित्त आयोग सुरू केल्याने आज राज्यातील मोडकळीस आलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था पुन्हा पुनर्जीवित झाल्याने जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सभापती उपसभापती सन्मानित सदस्यांना विकास कामे करण्यासाठी शेवटच्या वर्षात सेस फंड मिळाल्याने गणातील विकास कामे मार्गी लागत असून अगदी कमी पैशात ही विकास कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न करत असून गणातील सर्व गावांना विकास कामाच्या माध्यमातून न्याय द्यायचा प्रयत्न केला असून आज शेरण खेल येथे गवांतर्गत बंदिस्त गटार चे काम मार्गी लागल्याने गावातील सांडपाण्याची दुर्गंधी दूर होणार असून या कामाचे आज उद्घाटन संपन्न झाले असल्याची माहिती माजी उपसभापती श्री मारुती मेंगाळ यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे …
दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे की 2014 सांली राज्यातील भाजप सरकारे पंचायत राज मधील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जवळपास सर्वच अधिकार कमी करण्यात आले होते पंचायत समिती गणात विकास कामे करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सेस फंड नसल्याने चार वर्षात विकास कामे करता आली नाही मात्र महा विकास आघाडी सरकारने 15 वित्त आयोग ही योजना आमलात आणल्याने स्थानिक स्वराज्य संस्था पुनर्जीवित झाल्या असून या माध्यमांतून लोकांचे प्रश्न मार्गी लागत असल्याचे मत मारुती मेंगाळ यांनी व्यक्त केले या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव दराडे,जिल्हा परिषद सदस्य सौ सुषमा दराडे, शिव सेना नेते डॉ विजय पोपरे,बाजारात समिती संचालक भाऊसाहेब कासार, आदिवासी ठाकर समाज संघटनेचे अध्यक्ष सुरेश पथवे, सचिव बाळासाहेब मधे, सरपंच दिपक पथवे, दिपक कासार, गणेश कोकणे, निवृत्ती सूर्यवंशी , नामदेव मधे, संजय मधे, विकास कासार, नाना मधे, भानुदास कासार, मारुती सोमा मेंगाळ, भरत गिऱ्हे, मनोज कोकणे, कोंडीबा मधे, एकनाथ मधे, लक्ष्मण हांडे, रामनाथ पथवे, सखाराम कासार,मधुकर कासार, शिवाजी कासार, या सहित अनेक कार्यकर्ते उपस्थित होते