ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर करावे

ॲड श्रेयस देशमुख यांची केंद्रीय मंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे मागणी
संगमनेर(प्रतिनिधी) : केंद्रीय राज्यमंत्री मा प्रल्हादसिंह पटेल हे नुकतेच संगमनेर दौऱ्यावर आले असताना ॲड श्रेयस देशमुख यांनी प्रलंबित असलेले ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल मंजूर करून त्याचे कायद्यात रूपांतर करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली
देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि आपल्या देशात वकिल हे पोलिस आणि न्यायपालिकेप्रमाणेच न्याय वितरण प्रणालीतील एक आवश्यक दुवा म्हणून काम करत आहे परंतु पोलिस आणि न्यायपालिकेला संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि विशेषाधिकार उपलब्ध असताना वकिलांना समाजकंटकांकडून होणाऱ्या कारवायांपासून योग्य सरंक्षण दिले जात नाही.
मागील काही वर्षां पासून वकील व त्यांच्या कुटुंबांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये वाढ झाली असुन त्यांच्यावर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांची संख्या देखील मोठी आहे. हे सर्व टाळण्यासाठी बार कौन्सिल ऑफ इंडियाने २ जुलै २०२१ रोजी ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिलाचा मसुदा तयार केला असून तो सरकार दरबारी प्रलंबित आहे , सदरचे विधेयक मंजूर होऊन त्याच्ये कायद्यात रूपांतर झाल्यास वकिलांना विविध प्रकारे सरंक्षण मिळनार असून सदरच्या विधेयकात वकिलांच्या सामाजिक व शारीरिक सुरक्षा तसेच अवैध अटकेपासून सरंक्षणावर विशेष भर दिला आहे
सदरील विधेयक संसदेत मंजूर झाल्यास वकील मंडळी न्यायालयाचे अधिकारी म्हणून त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या सामाजिक आणि शारीरिक सुरक्षिततेची काळजी न करता. त्यांची कर्तव्ये निर्भयपणे पार पाडू शकतील असे देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे