शेवगाव तालुक्यात विवाहित महिलेची
गळफास घेऊन आत्महत्या!

शेवगाव दि 2
शेवगाव तालुक्यातील आखात वाडे येथील एका विवाहित महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली दारुड्या नवऱ्याच्या छळास कंटाळून तिने हे टोकाचे पाउल उचलले
मयत महिलेचे वडील बाळासाहेब गोरक्षनाथ उगले वय ४७ वर्षे धंदा शेती रा. आखातवाडे ता. शेवगाव जि. अहमदनगर यांनी . शेवगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे
त्यांनी म्हटले आज की मयत मुलगी प्रतिभा लक्ष्मण भुसारी हिचे लग्न दि. १२/०६/२०१५ रोजी आखातवाडे येथील लक्ष्मण बापु भुसारी रा. आव्हाणे खु। ता. शेवगाव जि. अहमदनगर यांचे सोबत समाजाचे रितीरीवजाप्रमाणे लग्न लावुन दिलेले होते. लग्नाचे नंतर तीन वर्षे माझी मुलगी प्रतिभा हिस तिच्या सासरच्या लोकांनी चांगले वागवीले त्या दरम्यान तिचे पतीपासुन तिला दोन मुली झाल्या. त्यानंतर माझी मुलगी प्रतिभा भुसारी हि मला फोनद्वारे आधुन मधुन सांगत असे की, माझा नवरा लक्ष्मण भुसारी हा दारु पिवुन घरी येवुन मला मारहाण करतो व म्हणत असतो की, तु शेतीचे काम करत नाहीस, तुला दोन्ही मुलीच झाल्या. त्याकारणावरुन तिचा नवरा तिस
मारहाण करत असे. त्यानंतर मी माझ्या मुलीला समजावुन सांगत असे की, काही टेंशन घेवू नको. मी तुझ्या पतीला समजावुन सांगीतले. त्यानंतर सन जानेवारी २०२२ या वर्षी मुलगी प्रतिभा हिस मुलगा झाला त्यानंतरही तिचा पती दारु पिऊन येत असे व तिला मानसिक, शारीरीक त्रास देत असे. त्यावेळी ती तिच्या पतीला सांगत असे की, तुम्ही दारु सोडुन द्या. दारु पिऊन तुम्हाला काय फायदा होणार, मुला-बाळाकडे लक्ष द्या. परंतु तो तिचे काही एक ऐकत नसे व तो माझ्या मुलीला मारहाण करत असे.
याबाबत माझी मुलगी प्रतिभा हिने वेळोवेळी फोन करुन कळविले होते. त्यानंतर दिनांक २६/०७/२०२२ रोजी १७/०० वा.चे. सुमारास मी व माझे सोबत आमचे गावचे सरपंच रघुवीर उगले असे आम्ही दोघे माझी मुलगी आव्हाणे खु। येथे जावुन माझ्या मुलीचा पती लक्ष्मण, मुलीची सासु रहिबाई, सासरे बापु यांना समजावुन सांगीतले की, माझ्या मुलीला त्रास देवु नका. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगीतले की, इथुन पुढे तुमच्या मुलीला
त्रास होणार नाही. असे सांगीतल्या नंतर आम्ही आमचे राहते घरी निघुन आलो. त्यानंतर माझी मुलगी प्रतिभा हि रक्षाबंधन सणासाठी आमचे घरी आली असता तिने आम्हाला सांगीतले कि,माझा पती दारु पिऊन मला विनाकारण त्रास देतो व सारखे म्हणत असतो की, तु कुठेतरी जाऊन जीव दे, कशाला जगते ?असे म्हणुन मला सारखे त्रास देत असतो. असे मला माझ्या मुलीने सांगितले. त्यावेळी मी माझ्या मुलीला समजावुन तिचे सासरी नेऊन सोडले.
दिनांक ३१/०८/२०२२ रोजी माझी मुलगी प्रतिभा हिला तिचा पती लक्ष्मण बापु भुसारी हा नेहमी दारु
पिऊन खुप त्रास देत असल्याने व तो तिला वारंवार आत्महत्येस प्रवृत्त करीत असल्याने त्याचे नेहमीचे
त्रासाला कंटाळुन मुलगी प्रतिभा हीने तिचे राहते घरी रात्री ११.१५ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे . तरी माझी मुलगी प्रतिभा हिचे मरणास तिचा पती लक्ष्मण बापु भुसारी हाच जबाबदार
आहे. असल्याची फिर्याद शेवगाव पोलिसांत दिली आहे
